Monday 1 March 2021

शहापूर परिसरात मोठय़ा प्रमाणात जंगलतोड, समृध्दीचे नाव जंगल तोडते गाव ?

शहापूर परिसरात मोठय़ा प्रमाणात जंगलतोड, समृध्दीचे नाव जंगल तोडते गाव ?


कल्याण (संजय कांबळे) : सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह विविध सामाजिक संघटनांनी ओसाड माळरानावर वृक्षारोपण करुन तो वृक्ष वेलीनी हिरवागार करण्याचा ध्यास घेतला असताना दुसरीकडे शहापूर तालुक्यातील काही गावांमध्ये मात्र समृद्धी महामार्ग च्या नावाखाली मोठ्याप्रमाणात जंगल तोड केली जाते आहे. याकडे वनविभाग सोईस्कर दुर्लक्ष करीत आहे. 
मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. या महामार्गामुळे कल्याण तालुक्यातील १० गावे, भिवंडी ७ आणि शहापूर तालुक्यातील २७ गावे बाधित झाली आहेत. यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला शासनाने दिला आहे. हा मार्ग काही प्रमाणात वनजमीनीतून जात असल्याने मोठय़ा प्रमाणात जंगलतोड झाली आहे. हिरवेगार डोंगर, टेकड्या ओसाड केल्या आहेत. ठिक आहे याला पर्याय नसल्याने तसेच विकासात्मक कामे पूर्ण करणे आवश्यक असल्याने समजू शकतो पण शहापूर तालुक्यातील शेरे, शेई, आंबार्जे हल, तशीच पुढील गावात मोठ्याप्रमाणात राजरोस पणे जंगलतोड केली जातेय. या बाबतीत विचारना केली असता हा लाकूडफाटा समृद्धी महामार्गात तोडलेल्या झाडांचा आहे अशी बतावणी केली जातेय. 
विशेष करून शेरे गावाचा विचार केला तर काही ठराविक महिला व पुरुष मंडळी मोठय़ा प्रमाणात जंगलसाफ करीत आहेत. घरी किंवा अडचणींच्या जागी लाकडाचा ढिग जमा करून ठेवला आहे. यामध्ये साग, शिसव, जांभूळ, ऐन, आदी इतर लाकडाचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथील वनरक्षक हे या लाकूड चोरांना सामिल असल्याचे बोलले जाते. 
दोन ते तीन वर्षांपूर्वी कल्याण तालुक्यातील वरप येथे मोठा गाजावाजा करून तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे वनविभागाने आम्ही इतके कोटी वृक्षलागवड करणार अश्या वल्गना केल्या त्याच जिल्ह्य़ातील त्याच कल्याण तालुक्यात शेजारच्या शहापूर तालुक्यात अशी जंगलतोड होणार असेल तर याला काय म्हणावे? त्यामुळे शहापूर वनविभागाने वेळीच जागे होऊन ही वृक्षतोड थांबवायला हवी अन्यथा येथे जंगल होते हे केवळ नकाशावर बघायला मिळेल. 

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...