Tuesday 23 February 2021

सोशल डिस्टन्सींग, मास्कच्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी दोन लेडीजबारसह एकूण पाच बार सील : महापालिकेची धडक कारवाई !!

सोशल डिस्टन्सींग, मास्कच्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी दोन लेडीजबारसह एकूण पाच बार सील : महापालिकेची धडक कारवाई !!


"नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे आयुक्तांचे आदेश"

ठाणे (२३) : सोशल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायजर वापराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन लेडीज बारसह एकूण पाच रेस्टॅारंट बारवर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करूत ते पाचही बार काल रात्री उशीरा सील केले. महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.

          कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्याचे तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दोनच दिवसांपूर्वी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथकाने धाडी टाकून ही कारवाई केली.

       या कारवाईतंर्गत नौपाडा प्रभाग समिती आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्ग दोन लेडीज बारसह एकूण पाच बारवर धडक कारवाई करण्यात आली. नौपाडा प्रभाग समितीमधील एलबीएस रोडवरील शिल्पा बार हा लेडीज बार उपायुक्त (अतिक्रमण) अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी सील केला.

          त्याचबरोबर माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत कापूरबावडी येथील सन सिटी या लेडीजबारसह हिरानंदानी इस्टेटमधील टीआरपी लाऊंज, पोप टेटस् आणि मायझो हे तीन बार उपायुक्त (अतिक्रमण) अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर यांनी सील केले.

          दरम्यान, या पाचही आस्थापनांवर महापालिका आयुक्तांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही असा इशारा महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !!

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !! कल्याण, प्रतिनिधी : जिजाऊ संघट...