Tuesday, 23 February 2021

करोनामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर !! अंबरनाथ", बदलापुरातील इच्छुकांची धाकधूक वाढली, खर्चाचे गणित कोलमडण्याची भीती"........

करोनामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर !!

"अंबरनाथ, बदलापुरातील इच्छुकांची धाकधूक वाढली, 
खर्चाचे गणित कोलमडण्याची भीती"........


अंबरनाथ : राज्यात करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने टाळेबंदी पुन्हा जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

मात्र याचा थेट फटका पुन्हा एकदा अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकांच्या नियोजनास बसण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पालिकेच्या निवडणुका होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. अनेक इच्छुकांनी गेल्या एप्रिल महिन्यापासूनच याची तयारी सुरू केली. 

मात्र आता निवडणुका पुढे जाण्याच्या शक्यतेने इच्छुकांच्या पोटात गोळा आला आहे. जनसपंर्क कायम ठेवण्यासाठी होणारा लाखोंचा खर्च आता हाताबाहेर जात असल्याने खर्चाचे गणित कोलमडण्याचीही भीती आहे. 
गेल्या एप्रिल महिन्यात अपेक्षित असलेल्या अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकांच्या निवडणुका अजूनही जाहीर होऊ शकलेल्या नाहीत.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात या निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून प्रभाग रचना, प्रभाग आरक्षणांची घोषणा करण्यात आली होती. 

मात्र त्यानंतर करोनाच्या टाळेबंदीमुळे निवडणुका अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्या. 
जानेवारी महिन्यापासून मतदार यादी पुनर्रचना, दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत. येत्या १ मार्च रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होईल. तर त्यानंतर ८ मार्च रोजी मतदान केंद्रांची यादी जाहीर होईल. 

मात्र त्याच वेळी राज्यात करोना रुग्णांची वाढणारी संख्या चिंतेचा विषय बनली आहे. जाहीर कार्यक्रम, सभा, संमेलने, आंदोलने, प्रचार कार्यक्रम थांबवण्याचे आवाहन खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच केले आहे.

No comments:

Post a Comment

गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या जेनिशाला आर्थिक मदतीची गरज !!

गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या जेनिशाला आर्थिक मदतीची गरज !! उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील बोकडविरा येथील जेनिशा...