Friday, 26 February 2021

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी कार्यक्षेत्र बदलाची नोंद संबंधित कार्यालयातून करुन घ्यावी : 'उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार'

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी कार्यक्षेत्र बदलाची नोंद संबंधित कार्यालयातून करुन घ्यावी :
'उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार'


        बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यांपैकी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण, यांचे कार्यक्षेत्र 11 तालुक्यांपुरते मर्यादित आहेत. या 11 तालुक्यांपैकी 2 तालुके अलिबाग व पेण हे मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (MMRTA) कार्यक्षेत्रात समाविष्ट आहेत. इतर तालुके प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA) रायगड मध्ये समाविष्ट आहेत.
    नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबईच्या दि. 24 जून 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार पेण व अलिबाग संपूर्ण तालुके MMRTA कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे या बदलाची नोंद ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी त्यांच्या परवान्यावर संबंधित कार्यालयातून करुन घ्यावी. यासाठी त्याबाबत योग्य बदल करुन घेण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयातील परवाना शाखेशी संपर्क साधावा. तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण यांच्यातर्फे सर्व नवीन ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी वाहनमालकांना ज्यांनी अद्याप परवाना घेतला नाही, अशा वाहनमालकांनी, कार्यक्षेत्राप्रमाणे विहित परवाना शुल्क भरुन परवाना घ्यावा. अन्यथा, वाहनांची नोंदणी निलंबित अथवा रद्द करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर शिवसेनेने घेतली हरकत !!

नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर शिवसेनेने घेतली हरकत !! ** नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचना नव्याने करण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी  ...