Friday 26 February 2021

महाआवास अभियान अंतर्गत तालुक्यातील मंजूर लाभार्थी कार्यशाळा आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न!

महाआवास अभियान अंतर्गत तालुक्यातील मंजूर लाभार्थी कार्यशाळा आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न! 


कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्र शासनाच्या महा - आवास अभियान अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत घरकुल योजनेतील १०० दिवसांच्या मंजूर घरकुल कार्यशाळेचे तसेच डेमो होम कोनशिला चे उद्घाटन मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते नुकतेच गोवेली येथील जिवनदीप महाविद्यालय पार पडले.


प्रथम दिपप्रज्वलन झाल्यानंतर या विभागाच्या विस्तार अधिकारी विशाखा परटोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक घरकुल योजना रखडलेल्या होत्या. परंतु आता शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यामुळे एकही घरकुल रखडणार नाही. असे सांगून सन २०१७ /१८ मध्ये एकही घर पेंडिंग नाही. केवळ माता रमाई घरकुल योजनेची १४ घरे निधी अभावी थांबली आहेत. तीही लवकरच पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


तर कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे यांनी सांगितले की कल्याण तालुका सर्वच घरकुल योजनांच्या बाबतीत जिल्ह्य़ात प्रथम क्रमांकावर आहे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शक्य झाले आहे . तसेच कल्याण पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी, विस्तार अधिकारी, कर्मचारी ग्रामसेवक, सरपंच यांचे योगदान मोठे आहे सातत्याने सलग दोन वर्षे आपण प्रथम क्रमांक मिळाला आहे काही ठिकाणी जागेची अडचण आली तेथे आमदारांच्या सल्ल्याने लाभार्थ्यांना खाजगी जागा उपलब्ध करून दिली. आणि यामुळेच कल्याण तालुक्याची मान ताठ असल्याचे गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे चे विस्तार अधिकारी संतोष पांडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की सन २०१९/२० मध्ये ६हजार २९२ घरकुलांना मंजुरी दिली तर अभियानांतर्गत ३८८ ना मंजुरी मिळाली पण निधी अभावी अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार किसन कथोरे यांनी मात्र तालुक्यातील कातकरी समाजाविषयी चिंता व्यक्त केली. ते आता हा समाज अडाणी व मागासलेला असल्याने यांचे जिवनमान दिवसेंदिवस कमी होत आहे अशीच परिस्थिती राहिली तर हा समाज नामशेष होईल अशी भीती व्यक्त करुन आपण वाडित जायला हवे, त्याच्या पर्यत योजना पोहचल्या पाहिजे या समाजाला मदतीची गरज आहे असे सांगून त्यांची कामे केली तर पुण्य मिळेल असा सल्ला दिला. पुर्वी माझ्या मतदारसंघात पाटलांच्या म्हशीला घर, पण आदीवाशी बेघर अशी स्थिती होती पण ती मी मोडून काढली.गरीबाला घर मिळालेच पाहिजे, असे आपणही काम करायला हवे. काही अडचणी आल्या तर आपण मार्ग काढू असे बोलून तालुक्यातील ग्रामपंचायती २० टक्के निधी खर्च करीत नसल्याचे बाब त्यांनी स्पष्ट केली, जनसुविधा, महिला बालकल्याण, अंपग, असे निधी खर्च झाले नाहीत तर ते परत जातात तसे आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. या प्रसंगी ग्रामीण रुग्णालय गोवेली शेजारी डेमो होम चे पायाभरणी आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर जीवनदिप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोंडविदे गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे, कल्याण पंचायत समितीचे उपसभापती रमेश बांगर, माझी सभापती रंजना देशमुख, भारत टेंभे, जिप सदस्या कविता भोईर सदस्य पांडुरंग म्हात्रे, प्रभारी उप अभियंता कुंभारे गटशिक्षणाधिकारी पाटील, डेमो हाऊचे इंजिनिअर गगे, हेरलेकर, या विभागाच्या विस्तार अधिकारी श्रीमती विशाखा परटोले, विस्तार अधिकारी व्ही आर चव्हाण, श्री संत, श्री हरड गोवेली ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा दिपक जाधव, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक, लाभार्थी आदी मान्यवर उपस्थित होते !

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...