कोकणवासीय पूरग्रस्त बांधवाना शिव शक्ती बाल मित्र बहिरवली ग्रामीण, मुंबई आणि पुणे मंडळाकडून कर्तव्य दक्ष मदतीचा हात !
कोकण :
२२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकणात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते, अनेकांचे संसार उध्वस्त झाले पावसाच्या पाण्याने लोकांना २ ते ३ दिवस घराच्या छतावर राहावे लागले असता अनेक संकटाना सामोरे जावे लागत होते.
पुराचे पाणी ओसरल्यावर लोकांच्या घरची परिस्थिती अतिशय वाईट होती घरामध्ये खूप मोट्या प्रमाणात चिखलाचा थर साचला होता अशा परिस्थितीत शिव शक्ती बाल मित्र मंडळातील लोकांनी सतत तीन दिवस चिपळूण व खेड या ठिकाणी जाऊन स्वच्छता मोहीम राबवून आपले कर्तव्य जोपासत समाजच ऋण फेडण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडले. आणि काही दिवसात त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू ताट, वाटी, ग्लास, चहाचा कप, निरंजन, फिनेल, डेटॉल, मच्छर अगरबत्ती, ब्लॅंकेट, टॉवेल, सतरंजी अश्या एकूण अकरा वस्तूंचे चिपळूण या ठिकाणी लोकांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन वाटप करून कोकणातील लोकांना कर्तव्य दक्ष मदत करून आपले दायित्व जपले आहे,यासाठी ग्रामीण, मुंबई व पुणे मंडळ,तसेच मंडळातील सर्व कार्यकर्ते यांचे मित्र परिवार, नातेवाईक आणि यामध्ये जि. प.प्रा.शाळा बहिरवली मराठी शाळेचे माजी शिक्षक यांनी देखील आर्थिक स्वरूपात मदतीचा हात पुढे केला.
No comments:
Post a Comment