Sunday 29 August 2021

म्हारळ वरप कांबा या पुरग्रस्त गावातील वीजबिल माफ करण्याची आमदार कुमार आयलानी यांची उर्जामंत्र्यांकडे मागणी !!

म्हारळ वरप कांबा या पुरग्रस्त गावातील वीजबिल माफ करण्याची आमदार कुमार आयलानी यांची उर्जामंत्र्यांकडे मागणी !!


कल्याण, (संजय कांबळे) : मागील जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व यानंतर उल्हास नदीस आलेल्या पुरामुळे उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात असलेल्या म्हारळ, वरप,काबा या गावात मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्यानें  नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अगोदर कोरोनाकाळात अडचणीत सापडलेल्या या भागातील लोकांचे विजबील माफ करावे अशी मागणी या भागाचे आमदार कुमार आयलानी यांनी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कडे केली आहे.

कोरोनाकाळात कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप कांबा या गावांना मोठा फटका बसला होता. अनेकांचे कामधंदे बुडाले, नोकरी गेली, त्यामुळे जगायचे कसे या विचाराने जनता त्रस्त असतानाच  मागील २२ जुलै रोजी या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. यामुळे उल्हास नदीस पुर आल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले, म्हारळ गावातील शिवाणी नगर, राधाकृष्ण नगरी, विठ्ठल नगर, आण्णासाहेब पाटील नगर, म्हारळ सोसायटी, तसेच वरप मधील गावभाग, ओमसाईबाबानगर, शिवशक्ती काँलनी, दर्गानगर, टाटा पावर हाऊस, मोरयानगर, पावशेपाडा, आदी भागात पाणी भरल्याने येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कल्याण तहसीलदार कार्यालयातून तलाठी अमृता बडगुजर यांच्या माध्यमातून या परिसराचे नुकसान पंचनामे झाले आहेत. परंतु अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. अशातच विद्यूत मंडळाने सक्तीने वीजबिल वसूली सुरू केली आहे. वरप गावातील कोरोनाने मृत्यू पावलेल्या कै. रवी बाळाराम भोईर यांच्या घराचे मीटर वीजबिल थकीत असल्याने विद्यूत कर्मचाऱ्यांनी  ते काढून नेले. त्यामुळे गावात संताप पसरला होता. यांनतर आमदार कुमार आयलानी यांनी या भागांत दौरा करून पाहणी केली होती. येथील पुराची भयानकता पाहून महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर व कोकणातील पुरग्रस्ताप्रमाणे म्हारळ, वरप, कांबा या गावातील नांगरिकांचे वीजबिल माफ करावे अशी मागणी आमदार कुमार आयलानी उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कडे केली आहे. त्यामुळे उर्जामंत्री या भागाला वीजबिल माफ करून दिलासा देतात का?याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...