Monday 30 August 2021

माणगांव पोलीसांच्या सतर्कतेमुळे वाचले वयोवृद्ध महिलेचे प्राण; पोलीसांचे सर्वत्र कौतुक !!

माणगांव पोलीसांच्या सतर्कतेमुळे वाचले वयोवृद्ध महिलेचे प्राण; पोलीसांचे सर्वत्र कौतुक !!


     बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : सोमवार दिनांक ३० ऑगस्ट रोजी माणगांव येथे सकाळी ११: १५ च्या सुमारास एर्नाकुलम-निजामुद्दीन ही ट्रेन मुंबई कडे जात असताना माणगांव शहरातील साबळे कॉलेज जवळ कोकण रेल्वे ट्रॅक वर एक वयोवृध्द महिला कौटुंबिक मानसिक त्रासाला कंटाळून झोपलेल्या स्थितीत असल्याची माहिती माणगांव पोलीसांना समजताच क्षणाचाही विलंब न करता माणगांव वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस लालासाहेब वाघमोडे आणि माणगांव पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार सानप व पोलीस अंमलदार साटम या पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या वयोवृद्ध महिलेला रेल्वे ट्रॅक वरून बाजूला करत आपल्या ताब्यात घेतले. आणि तिला पाणी देऊन तिची मानवतावादी भावनेतून आणि आस्थेने चौकशी केली. माणगांव पोलीसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका टळला. त्यामुळे त्या वयोवृद्ध महिलेचे अनमोल प्राण वाचले. 
     पोलीसांनी त्या वयोवृद्ध महिलेची सखोल चौकशी केली असता एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे सदर वयोवृद्ध महिलेला माणगांव तालुक्यातील भादाव येथील रहिवासी असून तिचे नाव कुसुम राणे असे असून तिच्या घरचे नातेवाईक तिला कोणीही सांभाळत नाहीत, आणि ती आजारी असल्याने तिला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी देखील  कोणीही घेऊन जात नाहीत म्हणून ती जीवनाला कंटाळून या ठिकाणी आल्याचे समजते. माणगांव पोलीसांनी तिच्या नातेवाईकांना समज देऊन तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. 
     माणगांव वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस लालासाहेब वाघमोडे तसेच माणगाव पोलीस स्टेशन चे महिला पोलीस हावलदार सानप ,व पोलीस अंमलदार साटम यांनी केलेल्या मानवतावादी कामगिरीमुळे संपूर्ण माणगांव तालुक्यात आणि पोलीस खात्यात त्यांचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !!

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !! मुंबई,  (शांताराम गुडेकर ) :         बूड़ोकन कराटे ...