सचिन वाझे उपचारासाठी भिवंडीतील खासगी रुग्णालयात दाखल.!!
अरुण पाटील, (कोपर), भिवंडी, दिं,31 :
मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याची प्रकृती बिघडल्याने त्याला भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी मंगळवारी दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मनसुख हिरेन हत्याकांडा बरोबरच मुकेश अंबानी यांच्या अंटालिया घराजवळ जिलेटीन ठेवल्याने सचिन वाझे देशभर चर्चेत आला आहे . या प्रकरणात त्याला अटक केल्या नंतर त्याची रवानगी तलोजा कारागृहात करण्यात आली होती . कारागृहात वाझे यास हृदय विकाराचा त्रास झाल्याने वाझे याच्या निकटवर्तीयांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मागितली होती . त्यांनतर त्यास भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे एखाद्या गंभीर प्रकरणातल्या आरोपीवर भिवंडीतील खासगी रुग्णालयात नेमके का दाखल करण्यात आले , हे सध्या तरी न उलगडणारे कोडे आहे. महत्वाचे म्हणजे सचिन वाझे अटकेपूर्वी पोलीस अधिकारी असल्याने त्याचा ठाण्यात चांगलाच दबदबा आहे. त्यातच भिवंडीतील ज्या खासगी रुग्णालयात सचिन वाझे यास दाखल केले आहे तेथून ठाणे शहर सधारणतः 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सचिन वाझे यास खरोखरच उपचारासाठी भिवंडी सारख्या ठिकाणी दाखल केले आहे किंवा त्यामागे काहीतरी राजकारण असावे अशी चर्चा सध्या शहरात रंगू लागली आहे.
सचिन वाझे यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना भिवंडीतील खासगी रुग्णालयात मंगळवारी चार वाजता दाखल करण्यात आले आहे अशी माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment