Tuesday, 31 August 2021

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने केला "केंद्रीय राज्य मंत्री" कपिल पाटील व आशा वर्कर्स यांचा सन्मान !!

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने केला  "केंद्रीय राज्य मंत्री" कपिल पाटील व आशा वर्कर्स यांचा सन्मान !!


अरुण पाटील, (कोपर), भिवंडी, दिं, ३१ :
           महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न ठाणे जिल्हा याच्या वतीने "केंद्रीय पंचायत राज" राज्यमंत्री कपिल पाटील यांचा भव्य सत्कार रविवारी दिनांक २९ ऑगस्ट २०२१ रोजी भिवंडी तालुक्यातील पडघ्या जवळील बी. बी. पाटील न्यु इंग्लिश स्कुल कुरुंद येथे करण्यात आला आहे.  यावेळी शहापूर तालुक्यातील जय महाराष्ट्र भजनी मंडळ आवरे यांनी गाण्यातून प्रबोधन केले. तर सामाजिक क्षेत्रातील योगदाना बद्दल समाज कल्याण न्यासचे संस्थापक डॉ. सोन्या पाटील, कवी, साहित्यिक अन्वर मिर्जा, चित्रकार सचिन पोतदार, आशा वर्कर मनिषा पाटील, कीर्तनकार सुरेश घरत, कायदेविषयक सल्लागार अँड. विजय दिवाणे अशा विविध क्षेत्रातील नागरीकांना सन्मानित करण्यात आले. 


तसेच कोरोना काळात आपला जीव मुठीत घेवून  कोरोना आजाराची जनजागृती करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. म्हणून भिवंडी तालुक्यातील नंदा मोरे, राजू कोबाड, सुनिता पाटील, शबाना मोमीन, सावधान पाटील, भावना भोईर, रुपाली रमाणे, भक्ती राऊत, शोभा मोहंडूळे, चित्रा फापे, रईसा शेख, ललिता रामोशी, सारिका झुंजारराव, या ”आशा वर्कर्स  यांचा सत्कार  करण्यात आला. तर कोरोना काळात कोरोना बाधित मृत्यू पावलेले पत्रकार रतन तेजे, प्रकाश निल, दिनकर गायकवाड, यांच्या कुटूंबियांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्य कमिटी व ठाणे जिह्या कमिटी यांच्या वतीने आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. 

तर ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध  मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे यांनी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे कडे सादर करण्यात आले. मुंबई -नाशिक महामार्गा वरील पडघा टोल नाका, भिवंडी येथील अंजूर फाटा - चिंचोटी रोडवरील मालोडी टोल नाका, तसेच भिवंडी - कल्याण टोल नाका व ठाणे -भिवंडी रोडवरील कशेळी टोल नाका या चारही महामार्गावर सद्या टोल वसुली सुरू आहे. मात्र या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. भिवंडी वाडा महामार्गावर तर अक्षरशः खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्तावरचा टोलनाका सद्या बंद आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरच हा टोलनाका सुरू होणार असल्याचे समजले आहे. मात्र या  रस्त्याची दुरुस्ती न करता हा टोलनाका सुरू केला तर सर्वांत आधी मीच हा टोलनाक्यावर कारवाई करेन असे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले. 

पत्रकार संघाच्या कार्यक्रमा निमित्ताने अनेक नागरिकांना प्रेरणा मिळावी आणि आपण अधिक काम चागले करावे असे यावेळी केंद्रीय "पंचायत राज" राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बोलतांना सांगितले. तर पत्रकार संघाच्या विविध मागण्या केंद्र सरकारकडून पाठपुरावा करून सोडविण्याचा प्रयत्न करेल. असे आश्वासन यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिले. 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न ठाणे जिल्हा याच्या वतीने अनेक ठिकाणी मदतीचा हात देण्यात आला आहे. तर सामाजिक बांधिलकी जपून आम्ही प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत असतो व सातत्याने नवीन उपक्रम हाती घेत असतो. असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे यांनी बोलताना सांगितले.  

अनामिका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष बी. बी पाटील, प्राचार्य अनामिका विशे, आणि सहकारी शिक्षिकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे यांनी बी. बी. पाटील स्कुलचे आभार व्यक्त केले.  

यावेळी  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, एस. पी. ग्रुपचे सदस्य सोन्या पाटील, महिला बाळ कल्याण सभापती श्रेया गायकर, जिल्हा परिषद सदस्य, कैलास जाधव, दयानंद पाटील, भिवंडी पंचायत समिती सभापती गुरुनाथ जाधव, पडघा सोसायटीचे सभापती श्रीकांत  गायकर, भिवंडी पंचायत समिती  सभापती रविकांत पाटील, माजी सभापती अशोक शेरेकर, बी. बी. पाटील, तहसीलदार अधिक पाटील, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे जिल्ह्याध्यक्ष भगवान चंदे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, जिल्हा सचिव नरेश पाटील, सचिव जनार्दन मोगरे, कार्यध्यक्ष संतोष गायकर, भिवंडी तालुका अध्यक्ष मेघनाथ विशे, भिवंडी शहर मनपा तालुका अध्यक्ष संजय भोईर, कार्याध्यक्ष सुराजपाल यादव, सचिव मोनिष गायकवाड, तालुका उपाध्यक्ष दीपक हिरे, सचिव मिलिंद जाधव, कल्याण तालुका अध्यक्ष जैतु मुठोलकर, उपाध्यक्ष राजेश जाधव, मुरबाड तालुका अध्यक्ष सतिश घरत, उपाध्यक्ष शंकर करडे, सचिव दिलीप पवार, शहापूर तालुका अध्यक्ष सुनिल घरत, सचिव प्रकाश अंदाडे, भिवंडी सदस्य नितीन पंडीत, अरविंद जैसवाल, फकरे आलन खान, संदिप गुप्ता, सुनिल देवरे, अनिल पाटील आणि ठाणे जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर मडके तर आभार पत्रकार  मेघनाथ विशे, पत्रकार मिलिंद जाधव यांनी केले.

No comments:

Post a Comment

कुणबी युवक मंडळ दापोली आणि कुणबी युवा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन !

कुणबी युवक मंडळ दापोली आणि कुणबी युवा प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन ! मुंबई, (केतन भोज) : ना...