ठाकूरपाडा गोवेली येथील आदिवासी बांधवाना मिळणार बोरवेलचे पाणी, एक वर्षांपासून बंद होती बोरवेल ?
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण मुरबाड महामार्गापासुन एक ते दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाकूरपाडा गोवेली येथील आदिवासी वाडीत गेल्या वर्षी खोदलेली बोरवेल नादुरुस्त झाल्याने बंद पडली होती. परंतु आता पत्रकार संजय कांबळे यांच्या पुढाकाराने ही बोरवेल लवकरच दुरुस्ती होणार असल्याने येथील आदिवासी बांधवांना बोरवेलचे शुद्ध पाणी प्यायला मिळणार आहे.
गोवेली ग्रामपंचायत हद्दीत ठाकूरपाडा ही आदिवासी वस्ती आहे. साधारण पणे ५०/६० घरे असलेल्या या वाडीत गेल्या वर्षी जिप शाळेच्या बाजूला बोरवेल खोदण्यात आली होती. सुदैवाने १५० फुटावर पाणी लागल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत होते. या पाण्यामुळे आजूबाजूच्या नांगरिकांना तसेच शाळेतील इयत्ता १ ली ते ४ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होत होता. परंतु काही कारणांमुळे ही बोरवेल नादुरुस्त झाली. यांच्या आजूबाजूला पालापाचोळा, गवत वाढले होते.
गोवेली गावाकडून येणाऱ्या रस्त्यावर अर्धा ते एक किमी अंतरावर दुसरी एक बोरवेल आहे, तिच्या वर मोटर बसवून गावात पाणी आणले आहे. परंतु लाईट गेली किंवा काही अडचणी आल्या तर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, किंवा गणपत हिंदोळे यांच्या विहिरीवरून पाणी आणावे लागते. असे येथील महिलांनी सांगितले. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काची बोरवेल दुरुस्ती करुन मिळावी अशी मागणी पत्रकार संजय कांबळे यांच्या कडे बोलून दाखवली.
त्यांनी ताबडतोब येथे भेट देऊन बोरवेलची पाहणी केली. बोरवेल परिसरातील वाडलेले गवत, पालापाचोळा स्वच्छ करण्याच्या सूचना येथील सुरेश हिंदोळे, सोमा हिंदोळे व इतर तरुण मंडळीला सांगितले व त्वरित भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा जिप ठाणे या विभागातील आर व्ही लव्हाटे यांना ही अडचण सांगितली, त्यांनी ही ताबडतोब या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व या बोरवेलचे सिंलेडर पँरेल तुटल्याचे सांगितले. लगेचच दुरुस्ती साठी पाऊले उचलली. तसे पाहिले तर कल्याण तालुक्यात २८४ बोरवेल आहेत. दर महिन्यात १५/२० बोरवेल दुरुस्त केल्या जातात. हातपंप, वाँल, वाशार, चैन तुटणे अश्या दुरुस्या निघतात. तर काही गावात लहान मुले किंवा इतर बोरवेल मध्ये दगड व इतर काही टाकल्याने नादुरुस्त होतात. असे लव्हाटे यांचे म्हणने आहे.
गोवेली ठाकूरपाडा येथील बोरवेल च्या दुरुस्ती चे काम प्राधान्याने हाती घेतल्याने ते येत्या सोमवार पर्यत पुर्ण होऊन आदिवासी बांधवांना बोरवेलचे शुद्ध पाणी प्यायला मिळणार आहे. त्यामुळे येथील गोवेली ग्रामपंचायतीच्या माझी सदस्यांं श्रीमती सुरेखा दुंदा हिंदोळे, सामाजिक कार्यकर्ते गणपत हिंदोळे, गुरुनाथ हिंदोळे, विठ्ठल हिंदोळे, सोमा हिंदोळे, सुरेश हिंदोळे, गुलाब हिंदोळे, रेश्मा हिंदोळे, कमल हिंदोळे आणि बुधाजी हिंदोळे, आदींनी पत्रकार व भूजल सर्वेक्षण विकास विभागाचे कर्मचारी यांचे आभार मानले आहे.
No comments:
Post a Comment