श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !!
आषाढी एकादशी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकड, मागणं, किंवा भेट घेण्यसाठी अनेक जन पायी वारीला जातात. पण, स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे यंदा आषाढी एकादशी निमित्त शिक्षणाची वारी जव्हार येथील आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप देण्याची वारी केली.
श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील पिंपळपाडा, बोंडारपाडा आणि वागणंपाडा या तीन जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी मुलांना दिनांक ६ जुलै २०२५ रोजी एकूण २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ह्या मध्ये साहित्य, एकेरी, दुहेरी, तिहेरी, चौकट वही, एकेरी मोठी वही, चित्रकला वही, कलर, प्रत्येकी पेन्सिल बॉक्स, रबर, कटर, पट्टी, पाणी पिण्यासाठी पाण्याची बॉटल, जेवणाचा डब्बा, आणि इयत्तेत प्रमाणे दफ्तर असे साहित्य वर्षभर पुरेल असे देण्यात आले. गेली पाच वर्षा पासून शैक्षणिक साहित्य देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जाते.
हे गाव जव्हार तालुक्यापासून २० किलोमीटर आत दरीत असल्यामुळे कोणी जात नाही पण संस्था मात्र सतत त्याठिकाणी जाऊन त्यांना मदत करीत असते. पिंपळपाडा गाव यंदा माझी मुख्यमंत्री स्वच्छ शाळा अभियान अंतर्गत तिसरा क्रमांक पटकावला. तसेच अजूबाजूच्या गावा मधील मुलांची संख्या या शाळेत वाढत असल्यामुळे यंदा या शाळेत पाचवी वर्ग देखील चालू करण्यात येणार आहे. तसेच बोंडारपाडा येथील गावकऱ्यांनी आदिवासी वाद्य जे त्यांच्या वाद्यान मध्ये पूजनीय असणारे तारपा भेट म्हणून दिले आणि संस्थेचे आभार मानले. यासाठी संस्थेचे अध्यक्ष रुपेश शिंदे, सचिव अजय भोसले, खजिनदार मंगेश निकम, सदस्य आरती गाढवे, पूनम सावंत, निशांत कोळी, शुभम कांबळे, पुष्पा लोंढे, अपर्णा आंग्रे आणि इतर सदस्यांनी मेहनत घेऊन हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले. या उपक्रमास मदत करणाऱ्या देणगीदारांचे खूप आभार.
वृत्तांत / प्रसिद्धी -
अजय भोसले,
सामाजिक कार्यकर्ता
८१०८९४९१०२
No comments:
Post a Comment