औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि. 28 : माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत नागरिकांना माहिती उपलब्ध करून देतांना व्यापक जनहिताचा विचार करावा असे जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ॲड. राम शेलकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासनाचे प्रभोदय मुळे, जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखेचे जन माहिती अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत नागरिकांनी मागणी केलेल्या माहितीच्या अर्जावर वेळेत माहिती उपलब्ध करून द्यावी. माहिती कोणती आणि किती उपलब्ध करून द्यावी याविषयी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे नागरिक या संज्ञेत संघटना, संस्था, पक्ष याचा समावेश होत नाही. यामुळे जनमाहिती अधिकारी यांनी याबाबत कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करून अधिनियमाची अंमलबजावणी करावी. व्यापक उद्दिष्ट, जनहित नसणाऱ्या माहिती अधिकार अर्जाबाबत माहिती नाकारण्याचा अधिकार आहे. प्रशासन पारदर्शक आणि गतीमानते बरोबरच लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न देशामध्ये माहिती अधिकार अधिनिमयाच्या अंमलबजावणीने साध्य करण्यात आला आहे. असे ॲङ शेलकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment