Thursday, 29 September 2022

निर्यातक्षमता वाढीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

निर्यातक्षमता वाढीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी निमा अरोरा


अकोला दि २९ सप्टेबंर:- जिल्ह्यातील उद्योजकांनी आपापल्या क्षेत्रात अधिक सजग होऊन आपल्या उत्पादनांची निर्यातक्षमता वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी शासनामार्फत विविध टप्प्यांवर मार्गदर्शन सुविधा उपलब्ध आहेत, त्याचा लाभही उद्योजकांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे केले.

जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,उद्योग संचालनालय,उद्योग विभाग, लघु उद्योग विकास बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने दी अकोला अर्बन बॅंक येथे ‘गुंतवणुक वृद्धी, निर्यात प्रचलन,एक जिल्हा एक उत्पादन’ याविषयावर उद्योजकांचे दोन दिवसीय (दि.२९ व ३०)प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. 

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, स्टेट बॅंक ऑफ इंडीयाच्या विभागीय व्यवस्थापक मंजुषा जोशी,जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक नयन सिन्हा, उद्योग लघुभारतीचे आशिष चंद्रा, अकोला इंड्स्ट्रीयल असो. चे उन्मेष मालू,व्यवसाय सुलभता ‘मैत्री सेवा’ चे राजकुमार कांबळे, सिड्बी नागपूरचे व्यवस्थापक आशिष मुनगट तसेच जिल्ह्यातील उद्योजक, सनदी लेखापाल, बॅंकर्स आदी उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा म्हणाल्या की, ‘एक जिल्हा एक उत्पादन’, या विषयावर लक्ष केंद्रीत करतांना आपल्या जिल्ह्यातील कृषी आधारीत उद्योगावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. शासनातर्फे उद्योगांच्या उत्पादनांच्या निर्यातवृद्धीसाठी व निर्यात क्षमता वाढविण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. या संधीचा उद्योजकांनी लाभ घ्यावा. आपल्या उद्योगातील संभाव्य अडचणींचा योग्य आढावा घेऊन त्यावर मात करुन पुढे वाटचाल करावी. व्यवसाय करतांना प्रत्यक्ष अनुभव घेणे हे अधिक महत्त्वाचे असते. आपल्या जिल्ह्यातील नवकल्पनांना वाव द्यावा. निर्यात क्षेत्रातील विविध बाबींचे, कायद्याच्या ज्ञानाचे आदान प्रदान करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित उद्योजकांना केले.

सुरुवातीला उद्योग प्रदर्शन दालनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक निलेश निकम यांनी केले. त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. अकोला जिल्ह्यातूनही निर्यातीस मोठा वाव असल्याचे स्पष्ट करुन अकोला जिल्ह्यातील उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन जया भारती यांनी केले.

No comments:

Post a Comment

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ! घाटकोपर, (केतन भोज...