औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि.29 : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी आज जिल्ह्यातील विविध विभागांचा आढावा घेतला. विभाग प्रमुखांकडून विकास कामांची माहिती घेत जिल्ह्याच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी विभाग प्रमुखांना यावेळी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी आज विविध यंत्रणांची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी शितल महाले तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र विकास कामे, रस्त्यांची कामे, प्राथमिक शाळा इमारत बांधकाम, दलितवस्ती सुधार योजना, कोल्हापूर बंधाऱ्यासाठी तीन हजार गेटची आवश्यकता असून यासाठी पावणेचार कोटी रुपयांची आवश्यकता, स्मशान भुमीच्या शेडचे काम तसेच सौंदर्यीकरणासाठी निधीची उपलब्धता, तालुकास्तरावर दिव्यांग भवन उभारणे, 63 केव्ही ची क्षमता वाढ करुन ती 100 केव्ही करणे, आवश्यकतेनुसार रोहित्राची उपलब्धता करण्यासाठी निधीची उपलब्ध करुन देणे, विभागीय क्रिडा संकुलाच्या सोयी सुविधांमध्ये वाढ करणे, घाटी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध खरेदी करणे अशा अनेक विभागांच्या कामांची माहिती यावेळी विभाग प्रमुखांनी पालकमंत्री संदिपान भुमरे यांना या बैठकीत दिली.
No comments:
Post a Comment