आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थित एकात्मिक बाल विकास प्रकल्प कल्याण यांचा 'पोषण माह' कार्यक्रम संपन्न !
कल्याण, (संजय कांबळे) : महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद ठाणे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कल्याण यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'पोषण माह, या अतिशय देखण्या कार्यक्रमाचे आयोजन म्हारळ ग्रामपंचायतीच्या सहकार्याने प्रिती अँकेडमी स्कूल व ज्युनिअर काँलेज म्हारळ येथे आमदार कुमार आयलानी यांच्या प्रमुख उपस्थित व कल्याण पंचायत समितीच्या सभापती श्रीमती अस्मिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी झेडपी सदस्यां जयश्री सासे, वृशाली शेवाळे, कल्याण पंचायत समितीच्या सदस्यां रंजना देशमुख, दर्शना जाधव, म्हारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रगती कोंगिरे, उपसरपंच अश्विनी देशमुख, वेदिका गंभीरराव, बेबीताई सांगळे, प्रमिला इंगळे प्रकाश चौधरी, मधू राणे, कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती भगत, सदस्य सोनाली उबाळे, वरप ग्रामपंचायत सदस्य दिपीका भोईर,कल्याण पंचायत समितीच्या बालविकास अधिकारी अर्चना पवार, पर्यवेक्षिका उषा लांडगे, जांभूळ बिटाच्या सुपरवायझर प्रज्ञा निपुर्ते, कार्यालयात क्लार्क, मुख्यसेविका आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी म्हारळ, वरप, कांबा या भागातील अंगणवाडी इमारतीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, म्हारळ नदी किनारी स्मशानभूमी, तसेच घाट, कांबा येथील तलावाचे सुशोभीकरण, जँगिग ट्रक, गार्डन, आदी विविध विकास कामासाठीच लाखोंचा निधी दिला आहे. आपण मागणी करावी ती मंजूर करण्याची जबाबदारी मी घेतो, असे त्यांनी सांगितले.
तर झेडपी सदस्यां जयश्री सासे यांनी म्हारळ, वरप, कांबा या भागात अंगणवाडी इमारतीचा प्रश्न असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाचे कौतुक केलं, गरोदर माताची ते मोठ्या प्रमाणात काळजी घेतात असे सांगितले, तसेच म्हारळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अश्विनी जाधव यांनी ही सेविका व मदतनीस यांच्या कामाचे कौतुक केले.
याप्रसंगी झेडपी सदस्यां वृशाली शेवाळे, कल्याण पंचायत समितीच्या सभापती अस्मिता अजय जाधव, सदस्यां रंजना देशमुख, दर्शना जाधव, सरपंच प्रगती कोंगिरे यांचीही भाषणे झाली.
यावेळी आमदार कुमार आयलानी यांनी जांभूळ बिटातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बनविलेल्या विविध रेसीपीची चव घेतली, तसेच त्यांनी बनविलेल्या फोटो प्रर्दशनाचे उद्घाटन ही केले, यावेळी अनेक बालकांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. शेवटी सामूहिक पसायदान घेऊन या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment