Friday 30 September 2022

*दरोड्यातील कुविख्यात दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद*

*दरोड्यातील कुविख्यात दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद*


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३० : पोलीस ठाणे पाचोड हद्दीत दिनांक २२/०६/२०२२ रोजी दाभरुळ शिवारात रात्रीचे वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन गंभीर दरोडयाचे गुन्हे घडले होते,  त्यानुसार पोस्टे पाचोड येथे गुरंन २१०/२०२२ कलम ३९५ भादवी व गुरंन २११/२०२२ कलम ३९५ भादवी प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, औरंगाबाद ग्रामीण, यांनी सदर गुन्हयाचे तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अमंलदार यांना गुन्हयात सहभागी असेलेले आरोपी निष्पन्न करून त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखने यापूर्वी सदर गुन्हे उघडकिस आणुन आरोपी नामे शाहरूख आब्रश्या पवार रा. टाकळी अंबड ता. पैठण व रोहीदास ऊर्फ रोहया रामभाऊ बर्डे रा. चौडांळा ता. पैठण यांना अटक केली होती व इतर आरोपीतांना निष्पन्न केले होते , त्यानुसार निष्पन्न *फरार आरोपी नामे नितीन ऊर्फ नित्या मिश्रीलाल चव्हाण रा. मालेगाव खुर्द ता. गेवराई जि . बिड* याचे मागावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मागिल दोन महिन्यापासुन होते परंतु तो सतत त्याचे राहण्याची ठिकाणे बदलत होता , तो सध्या प्रॉपर बीड शहरात आलेला असल्याची गोपनिय बातमी मिळाली तसेच तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तो सध्या मा . जिल्हा व सत्र न्यायालय बीडच्या आवारात असल्या बाबत खात्री पटल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक २९ / ०९ / २०२२ रोजी बीड शहरात गेले व तेथे जाऊन स्थानिक गुन्हे शाखा बीडचे अधिकारी व कर्मचारी यांची मदत घेऊन वरील आरोपीताचा जिल्हा व सञ न्यायालय परिसरात शोध घेत असता तो मा. न्यायालयाच्या गेटसमोर नगर रोडवर उभा असलेला दिसला त्यास ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्याच्या जवळ गेले असता सदर आरोपीसोबत असलेल्या त्याच्या महिला नातेवाईक यांनी स्थागुशाचे पथकासोबत हुज्जत घालुन, पोलीसांनी आरोपीस घेऊन जाऊ नये म्हणुन मज्जाव केला व सदर महिलांनी त्यांच्या अंगातील कपडे स्वतः फाडुन घेऊन, सार्वजनिक ठिकाणी नग्न होऊन आरडोओरड करुन अंगविक्षेप केला तसेच पोलीस पथकाच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. 

तरीही स्थागुशा औरंगाबाद ग्रामीणच्या पथकाने नितीन मिश्रीलाल चव्हाण, वय २५ वर्ष, रा. मालेगाव खुर्द ता. गेवराई जि.बीड यास ताब्यात घेतले आहे. सदर महिलांना स्थानिक महिला पोलीस अंमलदार व दंगाकाबु पथक बीडच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन पो. ठाणे शिवाजी नगर बीड येथे आणले, पथकातील पोउपनि प्रदीप ठुबे यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पो. ठाणे शिवाजीनगर , बीड येथे शासकीय कामात अडथळा करणे, शासकीय नौकराने आपले कर्तव्य पार पाडू नये म्हणुन मज्जाव करणे बाबत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयातील आरोपी नामे नितीन मिश्रीलाल चव्हाण याचे विरुध्द दरोडा, जबरी चोरी अशा स्वरुपाचे खालील प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल आहेत .

१) पाचोड २१० / २०२२ कलम ३९५ भादंवि

२)पाचोड २११/२०२२ कलम ३९५ भादंवि 

३) पैठण २०४ /२०२२ कलम ३९४, ३४ भादंवि

सदर आरोपीस पो. ठाणे पाचोड येथे गुन्हयाचे पुढील तपासकामी जमा करण्यात आ औरंगाबाद ग्रामीण जिल्हयातील आणखी गंभीर स्वरुपाचे गुन्हे सदर आरोपीकडुन उघड होण्याची शक्यता आहे .

सदरची कामगिरी मा. मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण, मा. पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक, * औरंगाबाद ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलीस उप निरीक्षक प्रदीप ठुबे, पोना शेख नदीम, शेख अख्तर, वाल्मीक निकम, विजय धुमाळ, पो. अंमलदार रामेश्वर धापसे, राहुल गायकवाड यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...