औरंगाबाद दि ३० सप्टेबंर: औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात मुले पळविणारी टोळी आली आहे तसेच त्यांची वाहने फिरत आहेत अशी अफवांचे पेव मोठया प्रमाणावर सोशल मिडीयाचे माध्यमांतुन नागरिकांमध्ये पसरली आहे.
वास्तवीक अशी कोणतीही घटना किंवा तसा प्रयत्न सुध्दा औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात घडलेला नाही. अशा घटनाबाबत पोलीसांना मिळणा-या माहितीला जिल्हा पोलीस दल हे सक्रिय व तत्परतेने जलद प्रतिसाद देत आहे. परंतु पोलीसांचे चौकशी मध्ये या फक्त अफवा असल्याचे निष्पन्न होत आहे.
अशा अफवा मध्ये नागरिक हे त्यांचे परिसरात आलेल्या अनोळखी महिला, पुरूष, फिरस्ती व्यक्त्ती, भिकारी, यांची कोणतीही खातरजमा नकरता केवळ त्यांचे वेशभुषा व हालचालीवरून त्यांना मुले पळविणारी टोळीतील सदस्य असल्याचा संशय धरून जमाव जमवुन मारहाण करतात किंवा बांधुन ठेवता तसेच संशयीत वाहनाची तोडफोड करण्याच्या घटना मोठया प्रमाणावर घडत आहेत.
याबाबत काही घटना पुढील प्रमाणे आहेत.
1) दिनांक 28/9/22 रोजी जालना जिल्हयातील भोकरदन ते जालना रोडवर सखाराम जाधव यांचे दुचाकीला भरधाव वेगातील कारचालकाने धडक दिली व यामध्ये त्यांचा नातु दिपक झरे (वय 6 वर्ष) हा कारच्या बोनटवर आदळला. व कारचालकाने त्याला तसेच 8 किमी सिल्लोड च्या दिशेने नेले यादरम्यान मुलाच्या ओरडण्याने नागरिकांना कारमध्ये मुले चोरणारी टोळी असल्याचा संशय आल्याने त्यांनी कारचा पाठलाग करून कार अडवुन 800 ते 1000 लोकांचे जमावाने कारची तोडफोड करून त्यातील पवन संजय बनकर वय 35 रा. गोळेगाव ता. सिल्लोड व इतर एक याला बेदम मारहाण केली. परंतु घटनेची माहिती मिळताच सिल्लोड शहर पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज व त्यांचे पथकाने तात्काळ सिल्लोड शहर सिमेलगत मुठोळ फाटा ता. भोकरदर येथे जात उग्र जमावाचे तावडीतुन कार मधील जखमी पवन बनकर यांना शिताफिने जमावाचे तावडीतुन बाहेर काढुन त्यांचा जिव वाचवला आहे.
2) दिनांक 20/9/22 रोजी सिल्लोड ग्रामीण हद्यीतील पळशी या गावातील शाळकरी मुलाचे टोळीने अपहरण केल्याची माहिती पोलीसांना देण्यात आली होती. यावेळी सुध्दा सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी जलद प्रतिसाद देत संपुर्ण जिल्हयात नाकाबंदी करून संशयीत वाहनाची तपासणी वेगाने सुरू केली. तसेच शेजारील बुलठाणा, जालना, जळगाव, औरंगाबाद शहर, अहमदनगर जिल्हा सिमा सुध्दा सर्तक ठेवत नाकबंदी करून वाहनतपासणी वेगाने सुरू केली होती. तसेच एक पथक अपहरण मुलाची माहिती गोळा करीत असतांना त्यांना चौकशीत ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले.
3) दिनांक 21/9/22 रोजी पोलीस ठाणे वडोदबाजार हद्यीतील आळंद येथे पांढ-या रंगाचे सुमो वाहन आले असुन त्यामध्ये मुले पळविणारी टोळी असल्याची माहिती परिसरात पसरली व भितीची वातावरण निर्माण झाले परंतु तात्काळ वडोदबाजार पोलीसांनी आळंद येथे जात संशयीत वाहनाचा शोध घेतला व ती अफवा निघाली.
*नागरिकांना आवाहन,*
औरंगाबाद ग्रामीण जिल्हयातील नागरिकांना आवाहन केले आहे कि, औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात कुठेही लहान मुले पळवुन नेणारी टोळी आलेली नाही किंवा सक्रिय नाही. जिल्हयात अशा प्रकारे सोशल मिडीयाचे माध्यमातुन या अफवा पसरविल्या जात आहेत. अशा कोणत्याही अफवावर नागरिकांनी विश्वास ठेवुन नये किंवा भिती बाळगु नये.
जिल्हा पोलीसांनी या अफवेची शहानिशा व सखोल चौकशी केली असता ही अफवा तत्यहीन व खोटी असल्याची खात्री झाली आहे. शाळा, महाविद्यालय, परिसरात पोलीसांची गस्त वाढविण्यात आली आहे. पोलीस यंत्रणा सर्तक असुन अशा घटनांना जलद प्रतिसाद दिला जातो त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भिती बाळगु नये. आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.
घर गल्ली, किंवा परिसरात संशयास्पद अनोळखी व्यक्ती, वाहन, आढळल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस ठाण्यास किंवा नियंत्रण कक्षास माहिती द्यावी. स्वत:हुन अशा संशयास्पद व्यक्तीस मारहाण अगर वाहनास तोडफोड, करु नये कायदा हातात घेऊ नये.
1) सोशल मिडीयावरिल कोणतीही माहिती नागरिकांनी स्वत: पडताळणी केल्या शिवाय पुढे फॉरवर्ड करू नये.
2) तुमच्या कडे आलेले मेसेज हे फॉर्वर्डेड असल्याचं पाहु शकता
3) व्हिडीओ, ऍ़डिओ पाहुन त्यावर लगेच विश्वास ठेऊ नका. जो पर्यंत त्याची पडताळणी होत नाही किंवा पोलीस तुम्हाला सांगत नाहीत तो पर्यंत नागरिकांनी अशा कोणत्याही व्हायरल गोष्टीवर विश्वास ठेवु नये.
4) सोशल मिडीयावर मुलांच्या अपहरणा संदर्भात काहीही आलं आणि तुम्हाला संशयास्पद वाटल तर तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा. पोलीसांना माहिती द्या.
5) शाळा, महाविद्यालय, गावात, किंवा गल्ली व परिसरात संशयास्पद व्यक्ती, वाहन फिरतांना आढळुन आल्यास तात्काळ 112 क्रमांकावर किंवा स्थानिक पोलीस ठाण्यास माहिती द्यावी.
6) जो कोणी व्यक्ती अशा प्रकारचे व्हिडीओ, संदेश, विनाकारण व्हायरल करून जाणीवपुर्वक अशी अफवा पसरवत असल्याचे आढळुन आल्यास त्याचे विरूध्द सक्त कायदेशिर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल.
*नागरिकांना संशय असल्यास खालिल क्रमांकावर पोलीसांना तात्काळ माहिती द्यावी. नमुद क्रमांक हे 24 तास नागरिकांसाठी कार्यान्वित आहेत.*
1) डायल 112 ( हेल्पलाईन )
2) नियंत्रण कक्ष औरंगाबाद ग्रामीण - 0240 – 2381633, 2392151
3) व्हाट्सअँप क्रमांक - 9529613104
No comments:
Post a Comment