Friday, 30 September 2022

आरोग्य सेवा आयुक्तपदी 'मा. तुकाराम मुंढे' रुजू !

आरोग्य सेवा आयुक्तपदी 'मा. तुकाराम मुंढे' रुजू !


मुंबई, अखलाख देशमुख, दि ३० : मा. श्री. तुकाराम मुंढे भा.प्र.से. यांनी आज शुक्रवार दिनांक ३० सप्‍टेंबर २०२२ रोजी आयुक्‍त आरोग्‍य सेवा व संचालक राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान या पदाचा पदभार मा. डॉ. एन. रामास्‍वामी भा.प्र.से. यांचेकडून स्विकारला.

त्‍यानंतर त्‍यांनी विविध आरोग्‍य कार्यक्रम व कार्यालयीन व्‍यवस्‍थेचादेखील आढावा घेतला. यावेळी आरोग्‍य आयुक्‍तालयातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री मुंढे यांनी सहजसाध्‍य, लोककेंद्रित, पारदर्शी, गुणवत्‍तापूर्ण व परिणामकारक आरोग्‍य सेवा राज्‍यातील जनतेला उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी कटीबध्‍द राहण्‍याच्‍या सूचना आरोग्‍य अधिका-यांना केल्‍या. आरोग्‍य आयुक्‍तालयापासुन ते ग्रामपातळीपर्यंत सार्वत्रिक, सहजसाध्‍य व माफक आरोग्‍य सेवा राज्‍यातील जनतेला पूरविण्‍याच्‍या दृष्‍टीने आरोग्‍याच्‍या सर्व निर्देशांकांवर उत्‍कृष्‍ठ कामाची अपेक्षा व्‍यक्‍त करताना आरोग्‍याच्‍या सर्व भागधारकांना विश्‍वासात घेऊन काम करण्‍याच्‍या सुचना अधिका-यांना केल्‍या. सार्वजनिक आरोग्‍य सेवा ही अत्‍यावश्‍यक सेवा असुन शासकीय आरोग्‍य संस्‍था २४ तास कार्यरत राहतील व आरोग्‍य सेवांपासुन राज्‍यातील कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ! घाटकोपर, (केतन भोज...