Wednesday, 28 September 2022

खानवलीची आदर्श कार्यकारी सोसायटी सभा उत्साहात संपन्न !!

खानवलीची आदर्श कार्यकारी सोसायटी सभा उत्साहात संपन्न !!


लांजा, दिपक मांडवकर/ विनायक खानविलकर :

लांजा तालुक्यातील खानवली गावातील आदर्श विविध कार्यकारी सोसायटी खानवलीची वार्षिक सभा सोसायटीचे विद्यमान चेअरमन आणि पंशक्रोशी बौद्धजन विकास मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक नरेंद्र गंगाराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा करत पार पडली. यावेळी सभेपुढे मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इत्तिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले . यावेळी सभासदांच्या उपस्थितीमध्ये पुढील वर्षासाठी कर्जमर्यादा निश्चित करण्यात आली. 


यावेळी सन २०२१-२२ सालच्या हिशोब तपासणी अहवालाचे वाचन करत संस्थेचे सचिव संतोष धामणे यांनी वाचन करत आगामी येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये संस्थेची सभासद संख्या वाढवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी संस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक कशी सेवा देता येईल यावर मार्गदर्शन केले . यावेळी या सभेसाठी संस्थेचे माजी चेअरमन आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मनोहर दादा भिडे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे चेअरमन नरेंद्र पवार म्हणाले कि संस्थेच्या कर्जधारांकडे असणारे थकीत कर्ज जास्तीतजास्त वसूल करून आणि जास्तीतजास्त कर्ज वितरण करून संस्थेचे कामकाज अधिक गतिमान कस करता येईल याकडे मी आणि माझे संचालक मंडळ अधिकाधिक लक्ष देणार आहोत. यावेळी सभेसाठी जमलेले ग्रामस्थ यांनी सभेचे अध्यक्ष आणि सोसायटीचे विद्यमान चेअरमन नरेंद्र पवार यांच्या कामावर समाधान व्यक्त करत त्यांचं कौतुक केलं. या सभेसाठी सोसायटीचे उपाध्यक्ष प्रकाश दळवी, मनोहर भिडे, निलेश खानविलकर , वाघोजी खानविलकर , प्रल्हाद कालकर, रवींद्र कानडे, प्रदीप गार्डी, यशवंत मांडवकर, अनंत खरात, दिलीप लाखण, शीतल भिडे,  संगीता कालकर, सचिव संतोष धामणे उपस्थित होते. यावेळी लावगण येथील श्रीराम मित्रमंडळाचे ज्येष्ठ सहकारी जितेंद्र खानविलकर यांनी सोसायटी संदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करत सोसायटीची जनरल सभा अध्यक्षांच्या परवानगीने पूर्ण करण्यात आली.

No comments:

Post a Comment

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ! घाटकोपर, (केतन भोज...