Saturday, 29 August 2020

वसई विरार महानगरपालिकेच्या ई वार्ड अंतर्गत हनुमान नगर येथे सुरू आहे अवैध बांधकाम !!

वसई विरार महानगरपालिकेच्या ई वार्ड अंतर्गत हनुमान नगर येथे सुरू आहे अवैध बांधकाम !!


'अधिकाऱ्यांचे कानावर हात'

वसई, प्रतिनिधी : वसई विरार महानगरपालिकेच्या ई वार्ड अंतर्गत हनुमान नगर, नालासोपारा (प.) येथे राकेश साकला ह्या भूमाफियाचे अनधिकृत बिल्डिंगचे काम सुरू आहे. राकेश साकला याने या आधी सुध्दा अनेक अनधिकृत बांधकामे केली आहेत. याच्या हनुमान नगर येथील अनधिकृत बांधकामाविरूध्द स्थानिक नागरिक, समाजसेवक व पत्रकार यांनी तक्रारी केल्या आहेत तरी हे बांधकाम सुरूच आहे. कष्ट करून स्वतःची जमापुंजी माणूस स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी खर्च करतो पण राकेश साकला सारखे अनधिकृत बांधकाम व्यावसायिक (भूमाफिया) यांच्या कडून तो फसविला जातो.
या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी असतात पण ई प्रभाग क्षेत्र वसई विरार महानगरपालिकेचे अधिकारी अनेक तक्रारी येऊन सुध्दा त्यांना काहीच माहिती नाही असे दाखवितात व काही तरी कारणे देऊन कारवाई टाळण्याचे प्रयत्न करतात.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना समाजसेवक रिपब्लिकन विकास आघाडीचे वसई तालुका अध्यक्ष विष्णू भाई यांनी ‌हे अनधिकृत बांधकाम जर महानगरपालिकेने निष्कासित नाही केले तर या विरुद्ध आंदोलन स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन करण्यात येईल असे सांगितले.
आता तरी ई वार्ड प्रभागातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी या अनधिकृत बांधकामांवर लगेच कारवाई करतील असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ! घाटकोपर, (केतन भोज...