मंदिरे खुली करण्यासाठी मुरबाड मध्ये भाजपाचे घंटानाद आंदोलन !!
मुरबाड (मंगल डोंगरे) : कोरोना महामारी संकटात सगळीकडे लाँकडाऊन परिस्थिती निर्माण झाली होती. त्या परिस्थितीत शाळा, काँलेज,सह उद्योग, धंदे,कारखाने ,कार्यालये,ते मंदिरे, देवस्थाने ही बंद ठेवण्यात आली होती. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कमी होत आहे.उद्योग धंद्यांसाठी माणसे हळूहळू हिम्मत करून घराबाहेर पडु लागली आहेत. अशातच सर्वत्र मंदिरे देवस्थाने बंद आहेत. ती तात्काळ खुली करावीत यासाठी आज भाजपा च्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात मंदिरांसमोर घंटानाद आंदोलने करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर मुरबाड शहरासह संपूर्ण मुरबाड तालुक्यात मंदीरे सुरु करा या मागणीसाठी अनेक धार्मिक संस्था व देवस्थानांच्या वतीने आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व खासदार मा.श्री.कपिल पाटील साहेब व भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार मा.श्री.किसन कथोरे साहेब* यांच्या सूचनेनुसार मुरबाड शहरातील हनुमान मंदिर, राममंदिर, शंकर मंदिर, जैन मंदिर, जोगेश्वरी मंदिर* इ. ठिकाणी घंटानाद आंदोलन करून या *आंदोलनाला पाठिंबा देऊन मंदिरे सुरू करण्याची मागणी राज्यसरकारकडे करण्यातआली .
सदर आंदोलनात भाजपा मुरबाड तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव सर, शहर अध्यक्ष सुधीरभाई तेलवणे, जिल्हा महिला अध्यक्षा शीतलताई तोंडलीकर, मुरबाड नगरपंचायतच्या नगराध्यक्षा छायाताई चौधरी, उपनगराध्यक्षा अर्चनाताई विशे, नितीन मोहपे सर ,माजी उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी , माजी नगरसेवक मोहन दुगाडे ,दिलीप देशमुख, संतोष (माऊली) चौधरी, वार्ड अध्यक्ष बाळू तेलवणे* इ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment