सौ.वसुधा वैभव नाईक (पुणे) यांच्या 'आईचे हळवे मन' लघु कथासंग्रहास पुरस्कार !!
'शिक्षण संजीवनी' मासिका तर्फे दरवर्षी साहित्य निर्मितीला विशेष पुरस्कार दिले जातात. यावर्षीचा हा पुरस्कार 'राजयुवा प्रकाशन' ने प्रकाशित केलेल्या वसुधा वैभव नाईक, पुणे यांच्या 'आईचे हळवे मन' या लघुकथा संग्रहास 'उत्कृष्ट साहित्य निर्मिती' हा पुरस्कार प्राप्त झाला.
हा पुरस्कार पुणे येथील पत्रकार भवन,नवी पेठ येथे प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष मा.श्री. एकनाथ आव्हाड (बालसाहित्यिक आणि लेखक) प्रमुख पाहुणे मा. स्वाती महाळंक (प्रमुख कार्यवाहक महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे) तसेच माधुरी गोखले,श्रुती कुलकर्णी, भालचंद्र कुलकर्णी,अविनाश सकुंडे, शिक्षण संजीवनी मासिकाचे संपादक देविदास लिमये आणि कार्यकारी संपादक डॉक्टर संजय दत्त जगताप आदी मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते. त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सोहळा उत्तम पार पडला.
या मासिकातर्फे महाराष्ट्रातील बाल साहित्यिक तसेच सामाजिक क्षेत्रातील लोकांना विविध पुरस्कार दिले जातात.
'आईचे हळवे मन' या लघुकथा संग्रहामध्ये शिक्षकांच्या जीवनातील अनुभव, आई म्हणून मुलांचे आलेले अनुभव आणि समाजातील विविध क्षेत्रातील लोकांचे आलेले अनुभव यावर लहान कथा लिहिलेल्या आहेत. ललित लेख म्हटले तरी चालेल.
हा कथासंग्रह आपल्याला निश्चितच आवडेल आणि रसिकांच्या मनावर राज्य करणार हे मात्र नक्कीच. यातील भाषाशैली साधी आहे. मनाला भावणारी आहे.
'आईचे हळवे मन' या कथासंग्रहास मिळालेल्या यशाबद्दल शिक्षण क्षेत्र, साहित्यक्षेत्र,सामाजिक क्षेत्र यातून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वृत्त - प्रमोद सुर्यवंशी (पुणे)
No comments:
Post a Comment