Thursday, 10 September 2026

समेळपाड्यात मा. नगरसेवक व भावाचे अनधिकृत बांधकामे !!

समेळपाड्यात मा. नगरसेवक व भावाचे अनधिकृत बांधकामे !!

*नालासोपारा, दि. १० सप्टेंबर २०२६ :*

अनधिकृत बांधकाम रोखण्याची जबाबदारी असणारे लोकप्रतिनिधीच अनेकदा अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे करत असल्याचे आढळून येते.

समेळपाडा येथील सर्व्हे क्रमांक २१/४ व २१/५ मधील बांधकाम परवानगीपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे केल्याचा प्रकार माहिती अधिकारातून उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे अनधिकृत बांधकाम हटविण्याची जबाबदारी असणाऱ्या पालिका प्रशासनाने वारंवार तक्रार दाखल करूनही दुर्लक्ष करण्याची भूमिका स्वीकारली आहे.

माजी नगरसेवक राजेश ढगे व भाऊ यतीन ढगे यांनी देवगड तालुक्यातील तिर्लोट गावात आईच्या नावे खोटा सातबारा तयार करून शेतकरी असल्याचे दाखवून समेळपाडा येथे जमिनी विकत घेतल्या, असा आरोप आहे.

विकत घेतलेल्या जागेवर पहिला महसूल खात्यात खोटे दस्तऐवज केल्याचा फौजदारी गुन्हा दाखल आहे. अनधिकृत इमारती उभ्या करून नागरिकांची, महसूल, नगररचना, सिडको, महानगरपालिका यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करून अनधिकृत वाढीव बांधकाम केले असल्याचा आरोप माहिती अधिकारातून बहुजन विकास आघाडीच्या रुचिता नाईक यांनी केला आहे.

तसेच काही ठिकाणी बांधलेल्या इमारती या १५ वर्षातच पडायला आल्याने महापालिकेने नोटीस देऊन धोकादायक इमारत घोषित केले आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रहिवाशांवर अवघ्या १५ वर्षातच बेघर होण्याची वेळ आली आहे.

या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्याची मागणी करणारी तक्रार पालिका आयुक्त, संबंधित सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांकडे करण्यात आली आहे. त्यावर संबंधित तक्रारीची शहानिशा, चौकशी आणि कारवाई करून अहवाल देण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे उत्तर पालिकेकडून देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...