Friday, 28 August 2020

महाड येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक कायमस्वरूपी प्रस्थापित करण्यासाठी 'पालकमंत्री आदिती तटकरे' यांचा पाठपुरावा !

महाड येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक कायमस्वरूपी प्रस्थापित करण्यासाठी 'पालकमंत्री आदिती तटकरे' यांचा पाठपुरावा !


बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे.  निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी तसेच नुकत्याच घडलेल्या महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन व निर्मूलनासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण (एन.डी.आर.एफ.) पथकाचा कायम स्वरुपी बेस कॅम्प जिल्ह्यात स्थापित करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा आपत्ती प्रसंगी आपत्ती व्यवस्थापनाचे काम जलदगतीने व्हावे तसेच आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत उपलब्ध व्हावी, म्हणून पालकमंत्री आदिती तटकरे यांनी काल दिनांक २७ ऑगस्ट रोजी राज्य आपत्ती व्यवस्थापन  विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत महाड येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण (एन.डी.आर.एफ.) पथक कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे व संबंधितांना तसे आदेश देण्यात आले आहेत.  
          तसेच महाड येथे कायमस्वरूपी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच भूकंप पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्राद्वारे विनंती केली आहे, त्यानुसार याबाबत शासन स्तरावर कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ! घाटकोपर, (केतन भोज...