Friday 28 August 2020

गणेशोत्सव काळात बाप्पा प्रसन्न नाहिच कोरोनोच्या रुग्ण संख्येत वाढच?

गणेशोत्सव काळात बाप्पा प्रसन्न नाहिच कोरोनोच्या रुग्ण संख्येत वाढच? 


कल्याण (संजय कांबळे) : संपूर्ण जगात कोरोना कोव्हीड या विषाणूंचा धुमाकूळ सुरू असतानाच आपल्या विघ्नहर्त्या च्या आगमनाने कोरोनाचा नायनाट होईल या आशेवर असणाऱ्या गणेश भक्तांची घोर निराशा झाली आहे. कारण गणेशोत्सवाच्या पाच दिवसाच्या काळात कोरोना अॅक्टिव रुग्णांची संख्या तब्बल २०० च्या आसपास गेली आहे तर कंटेन्मेंट झोण ची आकडे ३०० च्या घरात पोहोचली आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विशेष करून मुंबई, ठाणे व कोकणात याचे सर्वाधिक प्रमाण असते. परंतु सध्या जगासह देशावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले होते. समाधानाची बाब म्हणजे यंदा अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. तर बहुतेक मंडळांनी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. परंतु घरगुती गणेशोत्सवात नांगरिकानी म्हणावी तशी काळजी घेतली नाही असे वाटते. त्यांची धारणा होती की बाप्पा चे घरी आगमण झाल्यावर कोरोनावर विघ्नहर्ता विजय मिळवून भक्तांची सुटका होईल पण त्यांची घोर निराशा झाली असे गणेशोत्सव काळातील पाच दिवसाच्या आकडेवारी वरुन दिसून येते.
याच्या कारणांचा शोध घेतला असता असे समोर आले की गणेशोत्सव वेळी सोशलडिस्टींग चे पालन झाले नाही, आरतीच्या वेळी गर्दी झाली, सॅनिटायझर व मास्क वापरले नाही, कोणतेही सुरक्षेचे उपाय न करता  पत्यांचे डाव रंगले, दिड, तीन, आणि पाच दिवसाच्या गणेश विसर्जनाला खाजगी वाहनातून तोबा गर्दी आदी कारणे आहेत, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
कल्याण ग्रामीण भागात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते आज पर्यंत अॅक्टिव रुग्णाची संख्या १८५ वर गेली आहे. तर पाॅझिटिव पेंशंट ६०१ झाले आहेत, संस्थात्मक कोरोनटांइग ची संख्या २१५५ तर होमकोरोंटाईंग १२५१, तसेच कंटेन्मेंट झोन च्या संख्येत वाढ होईन ती २९० वर पोहोचली आहे. या सर्वामध्ये कोरोनाने मरण पावणा-याची संख्या २३ इतकीच आहे ही समाधानाची बाब आहे. त्यामुळे यावर्षी कोरोना चा भंयकर राक्षक विघ्नहर्ता विघ्नेश्वरावर भारी पडला असेच म्हणावे लागेल!

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...