Thursday, 27 August 2020

अमळनेरला शुक्रवारी होणार श्री मंगळ जन्मोत्सव... 'घरीच राहून श्री मंगळ देवतेचे नामस्मरण करण्याचे संस्थानाचे आवाहन'...

अमळनेरला शुक्रवारी होणार श्री मंगळ जन्मोत्सव... 'घरीच राहून श्री मंगळ देवतेचे नामस्मरण करण्याचे संस्थानाचे आवाहन'...



अमळनेर, प्रतिनिधी : येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात दरवर्षाप्रमाणे या वर्षीही भाद्रपद शुद्ध दहाच्या मुहूर्तावर अर्थात २८ ऑगस्ट रोजी श्री मंगळ जन्मोत्सव होणार आहे. मंदिराचा जुना ध्वज काढून नवीन ध्वज लावण्यात येईल. हा मान सामाजिक कार्यकर्ते तथा मंगलभक्त योगेश पांडव यांना दिला जातो.
        मंदिरात पहाटे पाचपासून विशेष पंचामृत अभिषेक प्रारंभ होतो. सकाळी सहाच्या सुमारास श्री. पांडव नवे ध्वज घेऊन सहकुटुंब सहपरिवार वाजतगाजत मंदिरात दाखल होतात. त्यानंतर सजविलेल्या पाळण्यात प्रतिमात्मक स्वरूपात श्री मंगळ देव ग्रह देवतेला श्रीफळ स्वरूप ठेवले जाते व जन्मोत्सव साजरा केला जातो. विधीवतरित्या ध्वजपूजन होवून नवे ध्वज मंदिराच्या कळसावर व मुख्य प्रवेशद्वारावर लावले जातात. भाविकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात न येता घरीच राहून श्री मंगळ देवतेचे नामस्मरण करावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेने केले आहे.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या अग्निसुरक्षा प्रशिक्षण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

उरणमध्ये शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या अग्निसुरक्षा प्रशिक्षण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद !! *** २० युवकांना मिळाला थेट लाभ ; रोजगाराचा...