Monday, 31 August 2020

राज्यात एक सप्टेंबर पासून स्वस्त धान्य दुकानदारांचा संप, गोरगरिबांची उपासमार होणार? संपाबाबत संभ्रमता!

राज्यात एक सप्टेंबर पासून स्वस्त धान्य दुकानदारांचा संप, गोरगरिबांची उपासमार होणार? संपाबाबत संभ्रमता!




कल्याण (संजय कांबळे) : कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भाव काळात स्वस्त धान्य दुकानदारांनी जिवावर उदार होऊन गोरगरिबांना धान्य वितरित केले. यामध्ये अनेक दुकानदारांना कोरोनाची लागण झाली तर काहिचा मृत्यू झाला. पण तरीही शासन दुकानदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या विरोधात महाराष्ट्र राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदार उद्या पासून म्हणजेच १संप्टेबर पासून संपावर जात असून यामुळे ऐन कोरोनोच्या संकटात गोरगरिबांची उपासमार होणार असे वाटते तर संप होणार की नाही याबाबत मात्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून संप होणार असलेबाबत चे पत्र आॅल महाराष्ट्र  रेशनिंग शाॅपकिपर फेडरेशन चे अध्यक्ष माझी खासदार गजानन बाबर यांनी शासनास दिले आहे.
देशातील कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लाॅकडाऊण लागू केले. या काळात गोरगरिबांची उपासमार होऊ नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने विविध प्रकारच्या धान्य योजना सुरू केल्या होत्या. यामध्ये सरसकट मोफत धान्य, तर दोन तीन रुपये किलो तसेच १२रुपये किलो गहू तांदूळ यांचा समावेश होता. परंतु अनेक रास्त भाव दुकाने ही संगणकांनी जोडल्याने थंम दिल्यानंतर धान्य देणे बंधनकारक करण्यात आले होते त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशातच स्थलांतर होणाऱ्या लोकांना देखील रेशनकार्ड विना धान्य देण्यात येत होते. यामुळे अनेक दुकानदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काहींचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. यामुळे दुकानदारांना विमा संरक्षण, त्यांची आरोग्य तपासणी, केसरी कार्ड धारकांना धान्य वितरण कमिशनात वाढ, तसेच दुकानदारांना इतर सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे आदी मागण्यांसाठी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, प्रधान सचिव, मंत्री  यांना निवेदन दिले होते. परंतु यांचे साधे चार ओळीचे उतर ही देण्याची तसदी शासनाने घेतली नाही. उलट न्यायालयाने आदेश देऊन चार आठवडे होऊनही निर्णय झाला नाही. त्यामुळे अभी नही तो कभी नही अशी हाक देत आॅल महाराष्ट्र रेशनिंग शाॅपकिपर फेडरेशन चे अध्यक्ष माझी खासदार गजानन बाबर यांनी उद्या म्हणजे १संप्टेंबर पासून राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदार बेमुदत संपावर जाणार असल्याचे पत्र दिले आहे.त्यामुळे अगोदर लाॅकडाऊण मुळे लोकांचे रोजगार गेले आहेत. शासनाने गोरगरिबांना जगवण्यासाठी मोफत व काही लोकांना अंत्यत कमी किंमतीत धान्य उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे कामधंदा नसतानाही निदान पोटतरी कसेबसे भरत होते. परंतू आता हे दुकानदारच संपावर जाणार असल्याने गोरगरिब व आदिवासी यांची उपासमार होणार आहे. 
 एकट्या ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हात १लाख ४६हजार प्राधान्य व अंत्योदय लाभार्थी कार्डधारक आहेत. तर सुमारे ५९२ रेशनिंग दुकाने आहेत त्यामुळे संप असेल तर त्यांना धान्य मिळण्यात अडचणी निर्माण होणार असे जिल्हय़ाचे डि एस ओ, आर बी थोटे यांनी सांगितले. तसेच रास्त भाव  दुकानदारांच्या संपा बाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तर ठाणे जिल्हा रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष जयराम मेहेर यांना विचारले असता ते म्हणाले उद्याच्या संपाबाबत साशंकता आहे. काही निर्णय घ्यायचे आहेत. त्यांनी या बाबतीत स्पष्ट बोलण्यास नकार दिला. तर कल्याण तहसीलदार दीपक आकडे आणि ठाणे जिल्हा डि एस ओ आर बी थोटे यांनी देखील संपाबाबत माहित नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे एक सप्टेंबर चा संप होणार की नाही हे उद्याच कळेल.

No comments:

Post a Comment

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ! घाटकोपर, (केतन भोज...