Monday 31 August 2020

मिशन बिगीन अगेन: ठाकरे सरकारची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरू-काय बंद !!

मिशन बिगीन अगेन: ठाकरे सरकारची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरू-काय बंद !!


मुंबई - राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवीन निमयावली जाहीर केली असून राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र, मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे.

*काय आहे नवीन नियमावली ?जाणून घ्या काय सुरू काय बंद*

कंटेनमेंट झोनमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम राहील

राज्यातील हॉटेल आणि लॉज १०० टक्के सुरु होणार
शाळा महाविद्यालये ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार

३० सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही

खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे

चित्रपटगृह ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहतील

मंदिरं आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाही

सिनेमागृह, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, मॉल्समधील थिएटर, बार, ऑडिटोरिअम इत्यादी जागा पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकही पुढील काळापर्यंत बंद ठेवली जाणार

मुंबई आणि एमएमआर मध्ये शासकीय कार्यालय ३० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहतील.

खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा, प्रवास करताना चालकासह टॅक्सीत चार तर रिक्षामध्ये तीन प्रवाशांना मुभा.

सार्वजनिक कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही तर, अंत्यविधी साठीदेखील २० पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकणार नाहीत.

राज्य सरकारने नियमांमध्ये आणखी शिथिलता दिली असली तरी सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयात मास्क, सोशल डिस्टंसिंग त्यांचे पालन बंधनकारक राहणार आहे.घरातील ६५ वयाच्या वरील नागरिकांचे व दहा वर्षाखालील बालकांची विशेष काळजी करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...