Friday, 21 August 2020

कल्याण तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कोरोना काळातील कामांचा अभिमान वाटतो - महिला व बालकल्याण सभापती !!

कल्याण तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कोरोना काळातील कामांचा अभिमान वाटतो - महिला व बालकल्याण सभापती !!


कल्याण (संजय कांबळे) : मी जा भागातून आले तो आदीवाशीचा डोंगराळ व द-या खो-याचा मागास भाग आहे. तेथील पालकांना रोजगाराची मोठी चिंता असते. त्यामुळे तिकडे कुपोषणाचे थोडेसे जास्त प्रमाण आहे. त्या मानाने कल्याण तालुक्यातील पालक जागृत व सक्षम आहेत. त्यामुळे कोरोनोच्या वाढत्या काळात देखील येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी खूपच चांगले काम केले आहे. याचा मला अभिमान वाटतो असे ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या सभापती श्रीमती रत्नप्रभा तारमळे यांनी तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी केंद्रात आयोजित कोरोना कोव्हीड सुरक्षा साहित्याचे प्रातिनिधिक स्वरूपाचे वापट प्रसंगी गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी व्यासपीठावर महिला व बालकल्याण समितीच्या व ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती जयश्री सासे, वृशाली शेवाळे, सभापती मॅडमचे पती भगवान तारमळे, कांबा गावचे ग्रामस्थ धिरडे महाराज पत्रकार संजय कांबळे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती उषा लांडगे, सुपरवायझर निलिमा घनगाव आणि जांभूळ बिटातील म्हारळ वरप कांबा येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.


तत्पूर्वी महिला व बालकल्याण सभापती रत्नमाला तारमळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तर सदस्या जयश्री सासे, व वृशाली शेवाळे यांनी दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
आपल्या भाषणात सभापती रत्नमाला तारमळे पुढे म्हणाल्या ", मी नुकताच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाची सूत्रे हाती घेतली असून जिल्ह्य़ात सर्व बीटनां भेटी देऊन अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोरोनोच्या संकट काळात अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांनी आत्मविश्वासाने काम केले. आपल्या परिसरातील स्वच्छता व रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची आहे. कारण तूम्ही सतत लहान बालकाच्या संपर्कात येतात. त्यामुळे तुम्ही आईचे काम करता. कारण आई ही आई असते दुधावरची साय असते. त्यामुळे तूमचे काम मोठे आहे. मी ज्या भागाचे नेतृत्व करते तो मागासलेला परिसर आहे. तेथील लोकांना पोट कसेही भरायचे याची चिंता वाटत असते त्यामुळे बालकाकडे त्यांचे दुर्लक्ष होते आणि म्हणूनच तिथे सॅम व मॅम च्या बालकांचे प्रमाण जास्त आहे. पण तुमचे काम अभिमानास्पद आहे. असे सांगून तूमच्या अडी अडचणी, समस्या अथवा नाविन्यपूर्ण काही योजना राबविण्याची असल्यास मी सदैव तुमच्या पाठीशी आहे असे त्या म्हणाल्या व कल्याण एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्याचे कौतुक केले.
तर जिल्हा परिषद सदस्य श्रीमती जयश्री सासे आपल्या भाषणात म्हणाल्या, तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाचे खरेच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी मी जिल्हा परिषदेच्या बैठकीत सतत तत्पर असते. तर सदस्या श्रीमती वृशाली शेवाळे म्हणाल्या ', तुमच्या कामापासून आम्ही प्रेरणा घेतो. इतक्या अडचणी काळात देखील कोणत्याही प्रकारची तक्रार न करता तूम्ही काम करत आहेत. तूमचे आभार मानायला हवेत, तुम्ही काळजी घेऊन काम करावे असा सल्ला त्यांनी दिला.
तर याप्रसंगी पत्रकार संजय कांबळे म्हणाले, आज कल्याण तालुक्यातील कोरोनोच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. आज तालुक्यातील १९ गावात एकही कोरोनाचा पाॅझिटिव रुण्ग आढळून आला नाही. यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सिंहाचा वाटा आहे. या घर सांभाळून कोरोचे काम करित असून याच ख-या कोरोना योध्दे आहेत. त्यामुळे शासनाने यांच्या कामांची दखल घ्यायला हवी. असे बोलून त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी नुकताच पदभार मिळालेल्या कल्याण एकात्मिक बालविकास अधिकारी उषा लांगडे यांनी सांगितले की कल्याण तालुक्यात नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येतात. त्यामुळे कल्याण तालुका ठाणे जिल्ह्यातील पहिला तालुका आहे. अशा योजना राबविणारा आहे असे सांगून तालुक्यात ८ बीट असून यातील जांभूळ बीटा अतर्गत येणाऱ्या म्हारळ वरप कांबा येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सॅनिटायझर, हॅन्डवाॅश, मास्क आणि फेससीड चे प्रातिनिधिक स्वरूपात वापट करण्यात आले असून हा कार्यक्रम संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी म्हारळ येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देण्यात आलेल्या ललिता पाटील, अलका भोईर, दिपिका विंचू, योगिता जाधव, संगीता म्हात्रे, जयश्री देशमुख, जयश्री सुर्यराव, रोहिणी सुर्यराव, राखी बुरांडे, सुरेखा धनगर, सुजाता सुर्यराव आदी चा गौरव करण्यात आला. या छोटेखानी व सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुपरवायझर निलिमा घनघाव यांनी केले. 
यावेळी म्हारळ वरप कांबा पावशेपाडा या परिसरातून अंगणवाडी सेविका व कर्मचारी उपस्थित होत्या. 
 

No comments:

Post a Comment

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ! घाटकोपर, (केतन भोज...