Tuesday, 25 August 2020

महाड इमारत दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसदारांना 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत - मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

महाड इमारत दुर्घटनाग्रस्त मृतांच्या वारसदारांना 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत - मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार


         बोरघर / माणगांव  ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील महाड शहरात  काजळपुरा भागात असलेली तारिक गार्डन इमारत काल दि.24 ऑगस्ट राेजी सायंकाळी 6 च्या सुमारास कोसळली.  
       या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज घटनास्थळाला भेट देवून दुर्घटनाग्रस्तांचे सांत्वन केले.
        श्री.वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून घटनेची संपूर्ण माहिती घेऊन तसेच पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप व नगरपरिषदेच्या अध्यक्षा श्रीमती जगताप यांच्यासोबत चर्चा करून या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वारसदारांना मदत व पुनर्वसन  विभागाकडून प्रत्येकी 4 लाख रुपये व मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1 लाख रुपये असे एकूण 5 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले. 
       याशिवाय या दुर्घटनेत  उध्वस्त झालेल्या कुटुंबांना भरीव आर्थिक मदत मिळण्यासाठी येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून ती मदत तातडीने देण्याचे  निश्चित प्रयत्न केले जातील, असेही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

शिवसेना प्रभाग क्रमांक १२३ च्या वतीने वेदांत हॉस्पिटल व ईशा नेत्रालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ! घाटकोपर, (केतन भोज...