राज्यात ३हजार १६५ नवीन वाढीव तलाठी सजे तर ५२८ महसुली मंडळे, ठाणे जिल्हात ७२ नवीन तलाठी सजांची निर्मिती, कल्याण मध्ये एक तर मुरबाड मध्ये तीन महसूल मंडळे!
कल्याण (संजय कांबळे) : राज्यातील वाढती लोकसंख्या व वाढते नागरिकरण या अनुषंगाने क्षेत्रीय महसूल यंत्रणेच्या कामात झालेली वाढ या विचार करून राज्यात एकूण ३ हजार १६५ नवीन वाढीव तलाठी सजे आणि ६ तलाठी सजा करीता १ मंडल अधिकारी या तत्त्वाप्रमाणे वाढीव तलाठी सजे साठी तब्बल ५२८ महसुली मंडळे स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली असून यामध्ये ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांत सुमारे ७२ नवे तलाठी सजे निर्माण होत आहे. तर कल्याण तालुक्यातील म्हारळ व मुरबाड मधील शिवळे, म्हसा आणि टोकावडे येथे नवीन मंडळांची निर्मिती करण्यात आल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
राज्यातील महसूल गोळा करण्याचे अंत्यत महत्त्वाचे काम महसूल विभाग करतो. पण वाढती लोकसंख्या व झपाटय़ाने होणारे नागरिकरण यामुळे महसूल यंत्रणेनेवर कमालीचा कामांचा ताण वाढला आहे. या यंत्रणेचा खूप महत्त्वाचा व स्थानिक पातळीवर काम करणारा कर्मचारी म्हणजे तलाठी होय.
साधारण पणे ६तलाठी सजा करीता १ महसूल मंडल असे तत्व आहे. त्यानुसार सजांची फोड पुनर्रचना करनेकामी नवीन सजा चे नकाशे सिमा निश्चिती, व नवीन सजाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी असावे या बाबतीत अहवाल पाठविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार उपविभाग निहाय उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्यांच्या कडून साजांची निश्चिती करण्यात आली होती. या सजांचा व त्यातील समाविष्ट गावांच्या बाबतीत जनतेच्या हरकती व सूचना पुराव्यानिशी मागविण्यात आल्या होत्या. परंतु तहसीलदार उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर,ठाणे यांनी प्रारुप अधिसूचितील तलाठी सजे व गावे बरोबर असल्याचे कळविले आहे. तथापि कल्याण व शहापूर तहसीलदार यांनी दुरुस्ती करणे सांगितले होते
शासन निर्णयानुसार राज्यातील वाढती लोकसंख्या व वाढते नागरिकरण यानुषंगाने क्षेत्रीय महसूल यंत्रणेच्या कामात झालेली नाही विचारात घेता राज्यात एकूण ३१६५ नवीन वाढीव तलाठी साझे व ६तलाठी साझे करीता १ महसूल मंडळे या तत्त्वाप्रमाणे ५२८ नवीन महसूल मंडळे स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात ७२ नवीन सजे निर्माण झाले आहेत.
या अगोदर कल्याण तालुक्यात ५ मंडळ अधिकारी सजा होते यामध्ये कल्याण, अप्पर कल्याण, ठाकुर्ली, टिटवाळा आणि नडगाव यांचा समावेश होता. परंतु म्हारळ, वरप कांबा या गावांची वाढणारी लोकसंख्या आणि झपाट्याने वाढणारे नागरिकरन यांचा विचार करून म्हारळ बु. या नवीन मंडल अधिकारी महसूल विभागाची नवनिर्मिती केली आहे यामध्ये तलाठी सजा म्हारळ बु. कांबा, रायते, वसत शेलवली आणि वाहोली यांचा समावेश असून म्हारळ बु., म्हारळ खु. कांबा, वरप, रायते, गोवेली, पिंपळोली, आणे भिसोळ, वसत शेलवली, आंबिवली तर्फे चोण, जांभूळ, मोहिली, नांलिबी, वाहोली, दहागाव, मांजर्ली, आपटी तर्फे चोण, आपटी तर्फे बा-हे अशा १८ गावांचा यात सहभाग आहे. म्हारळ बु. हे नवीन महसूल मंडळ अधिकारी निर्माण झाल्याने या परिसरातील नागरिकांची मोठी सोय झाली असून यामुळे नागरीकाचा वेळ व पैसा वाचणार आहे.
कल्याण प्रमाणेच मुरबाड तालुक्यात देखील ३ नवीन मंडल अधिकारी निर्माण करण्यात आले आहेत. यामध्ये शिवळे म्हसा आणि टोकावडे या महसूल विभागाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या अगोदर मुरबाड तालुक्यात ५ मंडळ सजा होते आता त्यामध्ये ३वाढल्याने एकूण ८ मंडल अधिकारी झाले आहेत. शिवळे मंडल अधिकारी अंतर्गत कोलठण, भालूक, ठाकरे नगर, पवाळे, टेंभरे, पिंपळगाव, शिवळे, कोंडेसाखरे, नढई, आंबेळे (बु) डेहणोली, माल्हेड, खाटेघर, कळमखांडे, जामधर, खंदारे, कुडवली, देवपे, आणि देवगाव, तर म्हसा मंडल मध्ये मानिवली शि, बेहरे, शिरवली, सासणे, न्हावे, तोंडली, म्हसा काचकोळी, माणगाव, शिलंद, कान्होळ, चिरड, पाटगाव, भाळेगाव, चंद्रपूर, माहेरघर, डोंगरन्हावे, आगाशी, आंबेटेंभे या गावांचा तर टोकावडे मंडल मध्ये टोकावडे, हेदवली, करचौडे, तळवली बा, शिरोशी, शाई, मांदोशी, बुरसुंगे, वेळूक, शेलगाव, आळवे, खेड, वनोटे, बेळगाव, रांजणगाव, खापरी, उमरोली, मानवली, किसळ, इंदे, सायले, साजगाव, पारगाव, माळ, चोसाले, आंबिवली, कोचरे इत्यादी गावांचा समावेश आहे.
कल्याण, मुरबाड तालुक्याप्रमाणे अंबरनाथ, भिवंडी व शहापूर येथे ही काही तलाठी सजे व मंडल आधिकारी विभाग वाढले आहेत. यासंदर्भात कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना विचारले असता ते म्हणाले "वाढती लोकसंख्या व झपाट्याने होणारे नागरिकांरन यामुळे महसूल विभागावर कामाचा ताण वाढतो तो यामुळे कमी होईल व नांगरिकाचीही सोय होईल.
No comments:
Post a Comment