Tuesday 25 August 2020

एक हात आपुलकीचा, विश्वासाचा, आपल्या माणसांना सावरण्याचा, या उपक्रमार्तगत मराठी नाटक समूहाची कलाकारांना मदत !!

'एक हात आपुलकीचा, विश्वासाचा, आपल्या माणसांना सावरण्याचा, या उपक्रमार्तगत मराठी नाटक समूहाची कलाकारांना मदत !!


कल्याण (संजय कांबळे) : मराठी नाटक समूहाच्या “एक हात आपुलकीचा, विश्वासाचा, आपल्या माणसांना सावरण्याचा” ह्या उपक्रमाअंतर्गत, रंगमंच कामगार अर्थात पडद्यामागील कलावंतांना मदतीचं वाटप मागील मे 2020 पासून सुरू झालेले असून प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते प्रंशात दामले यांच्या सारखे शंभर हुन अधिक कलाकार या समूहाचे सदस्य आहेत. 
संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार उडाला. लाॅकडाऊण लागू झाल्याने अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. यातून कोणतेही क्षेत्र वाचले नाही. त्यातल्यात्यात चित्रपट व नाट्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. मोठ्या कलाकारांना तसा फारसा फरक पडला नाही. परंतु पडद्यामागच्या कलाकारांची बिकट अवस्था झाली होती हे ओळखून अभिषेक मराठे या तरुणाने मराठी नाटक समूहाची स्थापना करुन एक व्हाट्सअप्प ग्रुप बनवून यामध्ये प्रायोगिक, व्यावसायिक, जेष्ठ, कनिष्ठ रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक, कवी, निर्माते, कलावंत, तंत्रज्ञ, प्रेक्षक, आणि समीक्षक यांचा समावेश केला. सर्व नियोजन व्हाट्सअप्प ग्रुप वर करुन नामांकित अशा रंगकर्मींना एकत्र आणले. यामध्ये प्रशांत दामले, चंद्रकांत कुलकर्णी, अभिराम भडकमकर, पुरुषोत्तम बेर्डे, सचिन गोस्वामी, कौशल इनामदार,, कुमार सोहनी, चं प देशपांडे, यांच्या सारखे १०० हुन अधिक नामवंत कलाकारांचा समावेश आहे. या सर्वाच्याच मदतीतून मे 2020 -मध्ये 275 पडद्यामागील कलाकारांना प्रत्येकी रुपये 2,500/- प्रमाणे एकूण रुपये 6,87,500चे वाटप केले. तर जून मध्ये 316 पडद्यामागील कलावंतांना रुपये 2,500/- प्रमाणे एकूण रुपये 7,लाख90,हजार आणि जुलै महिन्यात - 318 पडद्यामागील कलावंतांना प्रत्येकी रुपये 2500/- प्रमाणे एकूण 7,लाख95 हजार रुपये व आता ऑगस्ट 2020 -मध्ये तब्बल 324 पडद्यामागील कलावंतांना प्रत्येकी रुपये 2,500/- प्रमाणे एकूण रुपये 8लाख ,10,हजार - इतक्या रक्कमेचे वाटप दिनांक 09 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट ह्या कालावधीत पूर्ण झालेली आहे.
मदतनिधी वाटपाच्या ह्या चौथ्या टप्प्यात म्हणजे ऑगस्ट 2020 ह्या महिन्यामध्ये वापट केलेल्या वर्गवारीचा विचार केला तर यामध्ये - 
नेपथ्य कामगार – 145, साहित्य विभाग – 22, ध्वनीव्यवस्था – 15, 
व्यवस्थापक – 25, रंगभूषा, केशभूषा – 23, प्रकाशयोजना – 27, द्वारपाल – 15, 
कपडेपट – 15, उपहारगृह कर्मचारी – 04, चालक – 10, बुकिंग क्लार्क – 22, जाहिरात विभाग - 01असे 
एकूण - 324 कामगारांना मदत मिळाली आहे. 
मे, जून, जुलै आणि ऑगस्ट ह्या चार महिन्यांमध्ये मिळून एकूण रुपये 30,लाख 82,हजार 500/- रुपयांचे मदतनिधी वाटप समूहाने पूर्ण केलेले आहे.
सदर रक्कम ही थेट त्या त्या पडद्यामागील कलावंतांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने ह्या मदतीचा थेट फायदा त्या त्या कलावंतांना होत आहे
आता सप्टेंबर महिन्यासाठी मदतनिधी जमा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, आणि रसिक भरभरून प्रतिसाद देत आहेत ही अत्यंत आनंदाची उत्साहाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.असून ही मदत नाट्य व्यवसाय सुरू होईपर्यंत  देण्याचा मानस आहे. असे अभिषेक मराठे यांनी सांगितले. तर मराठी नाटक समूहाचे आशीर्वाद मराठे यांना विचारले असता ते म्हणाले '


- नवीन स्थापन झालेल्या जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या पदाधिकार्‍यांबरोबर संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक ह्या ठिकाणच्या प्रायोगिक रंगकर्मींचा समन्वय घडवून प्रायोगिक नाटकांसाठी विशेष काहीतरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी पहिली झूम सभा यशस्वी संपन्न केली आणि त्यासंदर्भात पुढे काय करता येईल हयबद्दल विचार विनिमय सुरू आहे. 
हयाबरोबरच विविध नाट्यविषयक अनेक उपक्रम करण्याचा मानस आहे. व्हाट्सअप समूह असून देखील आपण समाजासाठी अनेक चांगले उपक्रम करू शकतो हे आमच्या समूहाने आपल्या कृतीतून दाखवून दिलेले आहे. आमच्या कार्यावरुन अनेकांनी प्रेरणा घेऊन आपले उपक्रम सुरू केलेले आहेत.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...