Monday 31 August 2020

ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यात सदतीस वर्षे सेवा केल्यानंतर ही पदोन्नती नाहिच, सेवा निवृत्ती निमित्त कल्याण गटशिक्षणाधिका-यांनी व्यक्त केली खंत?

ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यात सदतीस वर्षे सेवा केल्यानंतर ही पदोन्नती नाहिच,
सेवा निवृत्ती निमित्त कल्याण गटशिक्षणाधिका-यांनी व्यक्त केली खंत?


कल्याण (संजय कांबळे) : अंत्यत हाल, अपेष्टा, समस्या, अंणत अडचणींना तोंड देत गेली ३७ वर्षे ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील विविध जिल्हा परिषदेच्या शाळेत सेवा देणाऱ्या कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती शशिकला जगदीश अत्तरदे मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील खंत व्यक्त केली. परंतु मला आयुष्यात खूप चांगली माणसं भेटली त्यामुळे मी खूप सुखी व आंनदी आहे असे सांगायला देखील त्या विसरल्या नाहीत.


कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाची धुरा डिसेंबर २०१९ रोजी त्यांच्याकडे आली. शासनाच्या आदेशाची अंत्यत कठोर पणे अंमलबजावणी करणा-या व तितक्याच मनमिळावू व समजून सांगणा-या शिक्षणाधिकारी अशी त्यांची ओळख कल्याण तालुक्यात निर्माण झाली होती. मुळात उच्च शिक्षित असलेल्या श्रीमती शशिकला अत्तरदे मॅडम यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील सडवली जिल्हा परिषद शाळेपासून१९८३ मध्ये केली. ग्रामीण व अंत्यत मागासलेले हे गाव असल्याने या गावात लाईट, मेणबत्ती असा प्रकार नव्हता. इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाळा होती तर विद्यार्थी होते केवळ ६०, अशाही परिस्थितीत दररोज ८/१० किमी अंतर पायी चालत जाऊन शाळेत जावे लागत होते. अशी ९ते १० वर्षे सेवा केल्यानंतर विवाह जमल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला व ठाणे जिल्हा परिषदेत रुजू झाल्या. येथेही ठाणे जिल्ह्यातील अंत्यत मागास म्हणून ओळखला जाणारा शहापूर तालुका मिळाला. १९९१ मध्ये तालुक्यातील सावरोली जिप शाळांमध्ये अध्यापन सुरू झाले. तोच केवळ ६ महिन्यातच आईचे निधन झाले. त्यामुळे कुंटूबाची सर्व जबाबदारी यांच्या वर पडली. येथेही दळणवळणाच्या सोईची बोंबाबोंब. त्यामुळे मैत्रीण माधुरी रडे व स्वतः आडगाव ते सावरली असा सायकलवरून प्रवास सुरू केला. दोन मुली तोही ग्रामीण भागात इतका लांब सायकल वरून प्रवास करतात. याचे आजूबाजूच्या लोकांना अप्रूप वाटायचे. काहींनी विचारण्याचा प्रयत्न केला पण ध्येय निश्चित होते व जिद्द मनात होती. त्यामुळे काही अडचणी आल्या नाहीत.
शहापूर तालुक्यातील ३वर्षाच्या सायकलस्वारी नंतर अंबरनाथ तालुक्यात बदली झाली. येथे सेवा झाल्यानंतर विस्तार अधिकारी म्हणून बढती मिळाली व पुन्हा शहापूर तालुक्यात बदली झाली. येथूनही ठाणे व कल्याण येथे बदली झाली. अखेर डिसेंबर २०१९रोजी कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार अत्तरदे मॅडम यांच्या कडे आला. या ८ ते ९ महिन्याच्या कालावधीत त्यांनी अंत्यत चांगले काम केले. कामचुकार शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी कठोर पावले उचलली. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी बदली प्रकरणी खोटी व बनावट कागदपत्रे सादर करणा-या शिक्षकांची वेतनवाढ रोखण्याच्या काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी यांनीच केली. प्रसंगी कठोर व तितक्याच मनमिळावू व शांत स्वभावाच्या अत्तरदे मॅडम यांनी कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा चेहरा मोहरा बदलला. गेली ३७ वर्षे त्यांनी शिक्षण विभागात इमानेइतबारे सेवा केली. याकाळात आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळावा म्हणून कधीही कुणाचीही हुजरेगिरी केली नाही. तर आपल्या कार्यातून क्षेष्ठत्व सिद्ध करून त्या प्रशासनात आदर्श ठरलेल्या आहेत. त्यांनी या काळात अनेक विद्यार्थी घडवले जे आज विविध क्षेत्रात नामांकित हुद्द्यावर काम करत आहेत.
आज श्रीमती शशिकला अत्तरदे मॅडम सेवानिवृत्त होत आहेत. कोरोनाचे संकट घोंघावत असताना देखील शेकडो शिक्षक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व आशिर्वाद घेण्यासाठी कल्याण पंचायत समितीला येत आहेत. या निमित्ताने त्यांना विचारले की तुमच्या इतक्या प्रदीर्घ सेवा काळात कोणत्या गोष्टींची खंत व कोणती घटना सर्वाधिक आंनद देणारी असा प्रश्न विचारताच त्या म्हणाल्या "गेल्या २४ वर्षे सेवा काळात पदोन्नती मिळेल असे वाटत होते पण मिळाली नाही याची खंत वाटते तर आयुष तुमच्या सारखे पत्रकार, लोकप्रतिनिधी, तसेच सुरेश पवार, जरग, भारती, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अधिक शिकायला मिळाले असे त्यांनी सांगितले. तर या प्रसंगी कल्याण तालुक्यातील अनेक शिक्षकांनी लोकप्रतिनिधी, गटविकास अधिकारी श्वेता पालवे मॅडम आणि पत्रकार संजय कांबळे यांनी सेवानिवृत्ती निमित्ताने श्रीमती शशिकला अत्तरदे मॅडम यांना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...