Sunday 23 August 2020

डीवायएसपी शशिकिरण काशिद आणि पोलीस निरीक्षक रामदास इंगवले कोरोनावर मात करून जनसेवेत पुनःश्च रुजू झाल्याने माणगांवात आनंदाचे वातावरण !

डीवायएसपी शशिकिरण काशिद आणि पोलीस निरीक्षक रामदास इंगवले कोरोनावर मात करून जनसेवेत पुनःश्च रुजू झाल्याने माणगांवात आनंदाचे वातावरण ! 


       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील  माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक माननीय श्री. रामदास इंगवले साहेब आणि डीवायएसपी श्री. शशिकिरण काशिद साहेब यांनी आपल्या दुर्दम्य ईच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना तथा कोवीड १९ वर मात करून ते पुनःश्च आपल्या कर्तव्यावर तथा ड्यूटी वर रूजू झाले आहेत त्यामुळे माणगांव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी वर्गात आणि संपूर्ण माणगांव तालुक्यातील समग्र जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
     माणगांव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक माननीय श्री. रामदास इंगवले साहेब यांनी माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष आणि कर्तव्य कठोर डीवायएसपी शशिकिरण काशिद साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात माणगांव तालुक्यातील जनतेच्या हितासाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माणगांव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील भुरट्या चोर्या, दरोडे रोखण्यासाठी व त्यांना पायबंद घालण्यासाठी माणगांव तालुक्यातील विविध भागात गस्त वाढविल्या, तसेच हातभट्टी   दारूबंदी, ग्रामीण भागातील वादविवाद, कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलली, माणगांव बाजारपेठेतील मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी माणगांव बाजारपेठेतील मुंबई गोवा महामार्गाच्या दुतर्फा नो पार्किंग जागेत पार्किंग करणारे वाहन चालक, महामार्गालगत फूटपाथवर अतिक्रमण करून बसणारे छोटे मोठे दुकानदार, टपरी वाले यांच्या विरोधात धडक कारवाई करूनअनेक धाडसी निर्णय घेऊन अमुलाग्र बदल घडवून आणले. त्यामुळे माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले साहेब आणि डीवायएसपी शशिकिरण काशिद साहेब हे दोन्ही कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी माणगांव तालुक्यातील जनतेच्या विश्वासास पात्र ठरले असून माणगांव तालुक्यातील सर्व धर्मिय, सर्व समाज घटकातील जनता आणि त्यांच्या मध्ये एक अतूट विश्वासार्ह नाते निर्माण झाले आहे. 
     कोरोना तथा कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन काळात हे दोन्ही पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पोलीस सहकार्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कधीही आणि कुठेही आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही. 
    पोलीस खात्याच्या प्रेरणादायी '' सदरक्षणाय खलनिग्रहणाय '' या ब्रीदवाक्या प्रमाणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या या दोन्ही पोलीस अधिकार्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या दोन्ही पोलीस अधिकार्यांनी या काळात शासनाच्या नियमानुसार  कोरोंटाईन होऊन योग्य औषधोपचार घेऊन आपल्या प्रचंड व दुर्दम्य ईच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर तथा कोवीड १९ वर यशस्वीरीत्या मात करून पुनःश्च आपल्या कर्तव्यावर तथा ड्यूटी वर ते नव्या जोमाने रूजू झाले आहेत. आपले दोन्ही कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी कोरोनावर मात करून आल्यामुळे माणगांव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाच्या वेळी त्यांच्यावर माणगांव पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी यांनी पुष्पवृष्टी करून त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रामदास इंगवले साहेब आणि डीवायएसपी श्री. शशिकिरण काशिद साहेब दोघेही कोरोना मुक्त होऊन आपल्या कर्तव्यावर पुनःश्च रुजू झाल्याने माणगांव तालुक्यातील सर्व जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...