कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे वतीने नुतन आगार व्यवस्थापक श्री तेजस गायकवाड यांचे स्वागत !
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्ह्यातील राज्य परिवहन श्रीवर्धन आगारात नुकतेच नव्याने हजर झालेले आगार व्यवस्थापक श्री तेजस गायकवाड यांचे कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्वागत समारंभ कार्यक्रम दिनांक २४/०८/२०२० रोजी सकाळी ११:०० वाजता श्रीवर्धन आगारात आयोजित केला होता.
या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत श्री राहुल गायकवाड यांनी सांगितले की, कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना ही गेली साठ वर्षे रा.प.महामंडळामध्ये कार्यरत असून तसेच ही संघटना महापुरुषांचे विचार धारा घेऊन पुढे जात आहे आज या देशावर महापुरुषांची विचारधारा राज्य करीत असून कास्ट्राईब संघटनेचे सभासद त्याचे पाईक आहेत तसेच कास्ट्राईब राज्य परिवहन संघटना ही कर्मचाऱ्यांचे प्रश्न तळमळीने सोडणारे एकमेव संघटना आहे.
आगार व्यावस्थापक श्री तेजस गायकवाड यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की सर्व कर्मचारी मला सहकार्य करा कोणत्याही कर्मचार्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी मी सक्षम आहे, कोणत्याही कर्मचाऱ्यावर मी अन्याय होऊ देणार नाही.असे मत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी श्री मंगेश चांदोरकर,श्री के डी वाघमारे,श्री श्रीकांत ठोसर,श्री अनिल मोरे, श्री एस बी झरे, श्री उमेश मोरे,श्री भीमराव सूर्यवंशी, श्री भिमराव धाकडे,श्री एस बी साळवी,श्री एस बी कोळी, श्री रावसाहेब चित्ते, श्री धनराज चामणार, श्री शंकर इंगोले,श्री गोविंद खटके, श्री प्रमोद लाड, श्री नितीन कर्जावकर,श्री नाशिर पटेल, श्री राजेंद्र काशीद इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment