शाँर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत संसार जळुन खाक!!
मुरबाड : (मंगल डोंगरे) ऐन गौरी गणपती सणात धसई येथील एक घराला आग लागून घरातील जीवनावश्यक वस्तू जळुन खाक झाल्या आहेत.
घटनास्थळी तात्काळ महसूल विभागाचे धसई तलाठी संतोष पवार यांनी जागेवर जाऊन नुकसानीचा पंचनामा करण्यात येऊन १ लाख ५७ हजार रुपयांचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.
टोकावडे पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या व धसई महसूल विभागातील धसई गावातील सुनिता मारुती सुरोशे यांच्या राहत्या घरात अचानक आग लागल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य कपडालत्ता ते जीवनावश्यक सर्व वस्तू खाक झाले. या आगीत किमान १ लाख ५७ हजाराचे नुकसान झाल्याचे व ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे महसूल विभागाचे तलाठी संतोष पवार यांच्या पंचनाम्यात नमूद मयत असून या महसूल तात्काळ मदत मिळण्याबाबत प्रयत्न केले आहेत.
No comments:
Post a Comment