**धर्मगुरू नामदेव महाराजांच्या शंभर वर्षीय वडिलांचे अपहरण**
मुरबाड, {मंगल डोंगरे} - भगवान श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण न्यास ,मथुरा उत्तर प्रदेश चे प्रमुख धर्मगुरू श्री नामदेव महाराज हरड यांच्या शंभर वर्षे वय असलेल्या वडिलांना जमिनीच्या वादातून त्यांच्या रहात्या घरांतून अपहरण केल्याची घटना घडली असून तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. याबाबत नामदेव महाराजांनी मुरबाड पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली असून पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला आहे.
भगवान श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण न्यास मथुरा, उत्तर प्रदेश चे प्रमुख धर्मगुरू व महाराष्ट्रात २०१५ साली झालेल्या नासिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचे संपर्क प्रमुख असलेले श्री नामदेव महाराज हरड यांचे मुरबाड तालुक्यातील नागाव हे गाव. या गावात त्यांची पत्नी, मुले व शंभर वर्षीय वडील आंबो हरड हे रहात आहेत. आंबो हरड यांची वयोमानानुसार स्म्रूती गेली आहे. त्यांचे पाच दिवसांपूर्वी नामदेव महाराज हे घरी नसताना सकाळी दहा अकरा वाजताचे, सुमारास काही व्यक्तींनी घरातून अपहरण करून नेले आहे. हे अपहरण गावातील माझ्या जवळच्या नातेवाईकांनी जमिनीच्या वादातून केले असावे असा दावा नामदेव महाराजांनी केला असून याबाबत मुरबाड पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे. नामदेव महाराजांच्या वडिलांचे अपहरण झाल्याची बातमी सर्वत्र पसरताच एकच खळबळ माजली आहे.
** मला देशपातळीवर नव्हे तर संपूर्ण जगात धार्मिक पातळीवर विविध शेकडो सन्मानाने सन्मानित केले असून माझ्या वडिलांचे अपहरण करणे हे निंदनीय आहे. माझी सर्व संपत्ती अपहरणकर्त्यांनी घ्यावी. परंतु माझ्या वडिलांची सुटका करावी ." -- नामदेव महाराज हरड**
*" याबाबत आमच्या पोलिसांनी चौकशी केली असता असे समजले आहे की, हा घरगुती जमीनीच्या वादातून सख्या भावांचा वाद आहे. आमचा तपास सुरु आहे. "दत्तात्रय बोराटे ,पोलीस निरीक्षक, मुरबाड पोलीस स्थानक"**
No comments:
Post a Comment