Thursday, 22 April 2021

महिलेला फेसबुक मैत्री पडली महागात,आयफोन भेट देण्याच्या बहाण्याने ४ कोटी उकळले !!

महिलेला फेसबुक मैत्री पडली महागात,आयफोन भेट देण्याच्या बहाण्याने ४ कोटी उकळले !!


पुणे - एका ६० वर्षीय महिलेला फेसबुकवर अनोळखी व्यक्तीसोबत झालेली मैत्री चांगलीच महागात पडली आहे. आयफोन गिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्याने या महिलेची तब्बल ३ कोटी ९८ लाख रुपयांची फसवणूक केली.

हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले आहेत. या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी महिला प्रतिष्ठित व्यक्ती असून एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. मागील वर्षी त्यांचा फेसबुक खात्यावर एका अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यांनी स्वीकारल्यानंतर त्यांच्यातच चॅटिंग सुरू झाले. समोरील व्यक्तीने आपण ब्रिटनमध्ये असल्याचे सांगून एका मोठ्या कंपनीत काम करत असल्याचे सांगितले. या महिलेचा विश्वास संपादन करून त्यांनी मोबाईल नंबर घेतला आणि व्हाट्सअप द्वारे त्यांचे चॅटिंग सुरू झाले.

दरम्यान मागील सप्टेंबर महिन्यात फिर्यादी यांचा वाढदिवस झाला.यावेळी आरोपीने त्यांना वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून आयफोन पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना आणखी फोन करून आयफोन पाठवला असून तो दिल्लीतील कस्टम विभागात पडल्याचे सांगितले. आयफोन सोडवून घेण्यासाठी काही पैसे भरावे लागतील असे सांगत आरोपीने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात वेळोवेळी लाखो रुपये भरण्यास भाग पाडले. दरम्यान त्यांनी वेळोवेळी ३ कोटी ९८ लाख रुपये भरूनही आयफोन न मिळाल्याने त्यांनी अधिक चौकशी केली असता त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

त्यांच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरु आहे

No comments:

Post a Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती ! ** माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाखांचा ध...