Tuesday 20 April 2021

राज्यात संचारबंदी लागू ! शेतकरी करु लागले पावसाळ्यापुर्वी कामांचा निपटारा !!

राज्यात  संचारबंदी लागू ! शेतकरी करु लागले पावसाळ्यापुर्वी कामांचा निपटारा !!


कल्याण, (संजय कांबळे) :
सर्वत्र कोरोनाच्या संकटामुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वाढत्या पार्दूभावा मुळे आता सर्व आस्थापना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना सुध्दा सकाळी सात ते अकरा ही वेळ दिला आहे. त्यामुळे यावेळचा शेतकऱ्यांनी सदुपयोग केला असून पावसाळ्यापूर्वीची कामे वेगाने सुरू केली आहेत.


गेल्या वर्षी कोरोना मुळे अनेकांची जीवन पध्दती बद्दलली, उद्योग धंदे, नोकरी याची पुरती वाताहात झाली. शेतकरी देखील यातून वाचले नाहीत. सर्वाचेच कोरोना मुळे मोठे नुकसान झाले. जिवीत व वित्त हानी झाली होती. यातून कसेबसे सावरत असतानाच पुन्हा देशात कोरोना ची दुसरी लाट उसळली. यावेळी मात्र कोरोनाने कहरच केला. दिवसागणिक हजारो रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह येवू लागले. त्यामुळे आॅक्शिजन बेड, व्हन्टेलिटर, औषधे यांचा तूटवडा भासू लागला. पर्यायाने अनेकांचा मृत्यू झाला व होत .अनेक पेंशट बेड साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. खर्ची, जमीनीवर, रिक्षात, जिधे जागा मिळेल तेथे उपचार करण्यात येत आहेत.
शासनाने ब्रेक द चैन साठी १४ एप्रिल पासून राज्यात जमावबंदी, संचारबंदी लागू केली. परंतु यानंतरही कोरोनाच्या रुग्णांना मध्ये वाढच होत आहे हे लक्षात घेऊन आता अत्यावश्यक सेवा देखील मर्यादित वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता सर्वांना घरीच रहावे लागणार आहे. मात्र यावेळचा आपटी गावातील शेतकरी वंसत शिसवे, रवी शिसवे आणि राजेश शिसवे यांनी पावसाळ्यात लागणार लाकूड फाटा फोडून तो सुरक्षित ठिकाणी,  पावसाळ्यात  भिजणार नाही अशा ठिकाणी रचून ठेवला जात आहे. या बरोबरच शेतीची राबणी, बांधबंदिस्ती, नांगरणी, अशी कामे देखिल सुरू केली आहेत.
आपटी गावा प्रमाणेच रायते, मानवली, कांबा, चोरे, जांभूळ, वसत, घोटसई, गोवेली, पिंपळोली, फळेगाव गेरसे कोसले उशीद, आदी कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू आहेत. 

No comments:

Post a Comment

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !!

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !! मुंबई,  (शांताराम गुडेकर ) :         बूड़ोकन कराटे ...