Saturday, 24 April 2021

महान वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांचे निधन !! "मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केला शोक"

महान वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांचे निधन !! 


"मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केला शोक"

पुणे - ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. अरुण निगवेकर (७९) यांचे पुण्यात राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली  वाहिली आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डॉ. निगवेकरांच्या पुण्यातील निवासस्थानी कोणीही गर्दी करु नये, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.

डॉ. अरुण निगवेकर यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे(यूजीसी) अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.१९९८-२००० या काळात ते पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर कार्यरत होते. यानंतर २००० ते २००५ या कालावधीत त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद भूषवले होते.याशिवाय शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनावर शिक्कामोर्तब करणाऱ्या ‘नॅक’चे ते संस्थापक संचालक देखील होते.

भारतातील उच्च शिक्षणात गुणवत्तापूर्ण आणि आधुनिकतेचा प्रवाह आणणारा महान वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरुण निगवेकर यांच्या निधनामुळे आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अरूण निगवेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

No comments:

Post a Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती ! ** माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाखांचा ध...