Tuesday 27 April 2021

विद्युत मंडळाची बत्ती गुल, लसीकरण हाऊसफुल्ल, सोशलडिंस्टिंगचा फज्जा, कोरोनाची मज्जा?

विद्युत मंडळाची बत्ती गुल, लसीकरण हाऊसफुल्ल, सोशलडिंस्टिंगचा फज्जा, कोरोनाची मज्जा?


कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाचा वाढता पार्दूभाव रोखायचा असेल तर लसीकरण मोठ्याप्रमाणात झाले पाहिजे या शासनाच्या अवाहनाला राज्यातील सर्वच भागात चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अगदी सुट्टीच्या दिवशी देखील लसीकरण सुरू केले आहे. परंतु कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात काल म्हणजे सोमवारी विद्यूत मंडळांने  त्यांच्या कामासाठी पुर्ण दिवस लाईट बंद केल्याने लसीकरण होऊ शकले नाही. यांचा परिणाम मात्र आज म्हणजे मंगळवारी प्रत्येक लसीकरण केंद्रावर दिसून आला. येथील प्रत्येक लसीकरण केंद्र हाऊसफुल्ल झाले होते. त्यामुळे सोशलडिंस्टिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते. तर कोरोनाला संसर्गासाठी मजेशीर वातावरण निर्माण झाले होते.


राज्यात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. कुठे ही रुग्णालयात जागा नाही, आॅक्शिजन बेड, व्हॅन्टेलटर मिळत नाही. अनेकांचा तडफडून मृत्यू होत आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ पाहत आहे. आभाळच फाटले आहे. शासनाकडून केले जाणारे उपाययोजना तोकड्या पडत आहेत. यामुळे शासनाने ब्रेक द चैन हा कार्यक्रम हाती घेतला. व राज्यात संचारबंदी लागू केली. हे करतानाच कोरोनाचा वाढता पार्दूभाव रोखायचा असेल तर लसीकरण मोठ्याप्रमाणात झाले पाहिजे म्हणून ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण मोहिम सुरू केली.
केवळ ठाणे जिल्ह्यातील ५ तालुक्यांचा विचार केला तर कालपर्यंत कल्याण ८ हजार ४,अंबरनाथ ९ हजार ९५२, भिवंडी २८ हजार ७५७, मुरबाड १२ हजार ४३९, शहापूर १४ हजार ९८५, असे एकूण ७४ हजार १३७, इतके नागरिकांना कोरोना कोविड लसीकरण देण्यात आली आहे. कल्याण तालुक्यातील  निळजे प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक म्हणजे ६ हजार च्या वर लसीकरण झाले आहे. दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १७०० तर ग्रामीण रुग्णालय गोवेली येथे २ हजार ११० इतक्या नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.
आरोग्य अधिकारी व कर्मचारी सिस्टर, आशा वर्कर, जीव धोक्यात घालून हे लसीकरण करत आहेत कल्याण तालुक्यातील दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्र, खडवली केंद्र, निळजे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय गोवेली येथे लसीकरण मोहिम सुरू आहे. अगदी सुट्टीच्या दिवशी देखील लसीकरण सुरू आहेत. असे असताना काल म्हणजे सोमवारी विद्यूत मंडळांने सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी पुर्ण दिवस लाईट बंद केली होती. मेंटेनन्स कामासाठी हा विद्यूत पुरवठा खंडित करण्यात येत असल्याचा मॅसेज व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे कोरोना कोविड लसीकरण मोहिमेचे बहुतेक काम हे तांत्रिक असल्याने व त्यासाठी लाईट असणे आवश्यक असते त्यामुळे लाईट अभावी खडवली, गोवेली, आणि दहागाव येथे लसीकरणामध्ये अडचणी येत होत्या. दहागाव व गोवेली येथील लसीकरण बंद करण्यात आले होते. यांना आज म्हणजे मंगळवारी बोलावण्यात आले होते. त्यामुळे गोवेली ग्रामीण रुग्णालयात व दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रंचड गर्दी उसळली होती. दुर्दैवाने येथे सोशलडिंस्टिंगचा पुर्ण फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते. कोरोनाला रोखायचा असेल तर सुरक्षित अंतर ठेवा असे वारंवार सांगितले जाते पण येथे तेच पायदळी तूडवले जात होते. त्यामुळे कोरोनाला आळा बसेल का? हा खरा प्रश्न आहे तर 
याहूनही मोठा धोका पुढे आहे तो म्हणजे १ मे पासून १८ वर्षापुढील सरसकट सगळ्यांना कोरोना कोविड लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. तेव्हा हे आरोग्य अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर आणि केंद्रे पुरेशी आहेत का? ऐवढ्यावर गर्दी नियंत्रण करता येईल का? की पुन्हा सोशलडिंस्टिंगचा फज्जा उडून कोरोना चा उद्रेक होईल अशी भीती वैद्यकीय अधिकारी व्यक्त करतात. तसेच यावर उपाय काय? असे विचारले असता ते म्हणाले 'सध्या शाळा, कॉलेज, महाविद्यालये, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद आहे. यांचा लसीकरणासाठी उपयोग केला तर. आमच्या वरील ताण कमी होईल. खरेच यामध्ये तथ्य वाटते आहे. शासनाने याचा जरूर विचार करायला हवा! 

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...