Tuesday 27 April 2021

शिक्षण सेवकांना कोरोना कामगिरीवर नियुक्त करू नये म्हसळा शिक्षण सेवकांचे तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन !!

शिक्षण सेवकांना कोरोना कामगिरीवर नियुक्त करू नये म्हसळा शिक्षण सेवकांचे तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन !!
       
                 
      बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : शासनाच्या माध्यमातून शिक्षण सेवकांना रुपये ६०००/ सहा हजार रुपये मानधनावर राबविण्यात येते, त्यात कुठलेही लाभ न देता अनेक कामांसह कोरोना निर्मुलना संबंधित कामे शिक्षणसेवकांकडुन करून घेत असल्याने शेवटी आज सोमवार दिनांक २६ एप्रिल रोजी म्हसळा तालुक्यातील सर्व शिक्षणसेवकानी एकत्र येऊन कोरोना कामगिरीवर नियुक्ती करण्यात येऊ नये अशी रोकठोक भूमिका घेत शिक्षण राज्यमंत्री मा. श्री. बच्चू कडू साहेब,  तहसीलदार साहेब म्हसळा, गट विकास अधिकारी तसेच गट शिक्षणाधिकारी म्हसळा यांना सामुहिक रीत्या लेखी निवेदन दिले. 
      सदर निवेदनाच्या माध्यमातून शिक्षणसेवकांना शिक्षणसेवक कालावधीत ६००० मानधना व्यतिरिक्त कायम स्वरुपी शिक्षकांसारखा कुठलाही शासकीय लाभ मिळत नाही. मेडिकल रजा, आरोग्य विमा, कर्ज, शासकीय रुग्णालयातील मोफत उपचार, प्रोत्साहन भत्ता, अग्रिम यासारखा कुठलाही शासकीय लाभ शिक्षणसेवकांना मिळत नाही. तसेच बऱ्याच जिल्ह्यात शिक्षणसेवकांचा कोरोना कामगिरीवर असताना कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. आणि संबंधिताचा परिवाराला कुठलाही शासकीय लाभ देण्यात आलेला नाही ही कैफियत मांडून आपल्या समस्यांकडे लक्ष वेधले. 
      तसेच म्हसळा प्रशासनाने निवेदन दिल्यानंतर सुद्धा शिक्षण सेवकांची कोरोना कामगिरीवर नियुक्ती केली आणि एखाद्या शिक्षण सेवकांचा जीवितास धोका उद्भवल्यास पर्यायी त्याचा मृत्यू झाल्यास कायदेशीररीत्या स्थानिक प्रशासन व संबंधित अधिकारी वर्ग आणि सर्वस्वीपणे महाराष्ट्र शासन जबाबदार राहील अशी निवेदनामार्फत आपली स्पष्ट भूमिका नमूद केली. 
       म्हसळा प्रशासनाने देखील शिक्षणसेवकांप्रती सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना कोरोना कामे देऊ नयेत असं म्हसळा तालुक्यातील सर्व वरिष्ठ शिक्षकांचेही एकमत आहे. तसेच तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचेही या गोष्टीला पाठींबा आहे. तेव्हा म्हसळा प्रशासनाने मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करून रुपये ६००० एवढ्या तुटपुंज्या मानधनावर कुठलाही लाभ न घेता काम करत असलेल्या शिक्षण सेवकांना कोरोना कामगिरीवर नियुक्त करू नये. असे लेखी निवेदन म्हसळा शिक्षण सेवकांनी म्हसळा तहसीलदार आणि गट शिक्षणाधिकारी म्हसळा यांना दिले.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...