कोरोनाच्या काळातही ग्रामपंचायतीचा कर भरायला येणाऱ्या नागरिकांसाठी समाजसेवक दत्तू सांगळे यांनी दिल्या खुर्च्या! आमदारांना ठणकावले?
कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाच्या काळातही ग्रामपंचायतीचा प्रामाणिकपणे कर भरायला येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, सोशलडिंस्टिंग चे पालन व्हावे यासाठी म्हारळ गावातील समाजसेवक दत्तू सांगळे यांनी म्हारळ ग्रामपंचायतीला १० खुर्ची दान केल्या असून यावेळी गावातील लोकांना वा-यावर सोडणा-या आमदार कुमार आयलाणी यांना देखील विविध प्रश्नांवर ठणकावले. त्यामुळे त्यांच्या या चांगल्या कामाचे कौतुक होत आहे.
कोणत्याही ग्रामपंचायतीचा आर्थिक डोलारा हा त्या गावातील नागरिकांनी भरणाऱ्या टॅक्स वर अवलंबून असतो. सध्या सर्वत्र कोरोनाच्या संकटामुळे सर्व संस्थांचा आर्थिक गोंधळ उडाला आहे. विविध प्रकारचे टॅक्स वेळेवर भरला जात नसल्याने विकास कामे करण्यात अडचणी येत आहेत. अनेक जण कोरोना चे कारण पुढे करून टॅक्स भरण्याचे टाळत आहेत. परंतु याला कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायत अपवाद ठरत आहे. येथील नागरिक इमानेइतबारे टॅक्स भरायला येत असतात. सुमारे ६० /७०हजार लोकसंख्येच्या या गावात ग्रामपंचायत कार्यालयात अपुरी जागा व कोरोनाची गंभीर परिस्थिती यामुळे कर भरायला येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रंसगी त्यांना उभे राहून किंवा कार्यालयाबाहेर उन्हात ताटकळत टॅक्स भरावा लागतो हे ओळखून म्हारळ ग्रामपंचायतीच्या सदस्यां श्रीमती बेबीताई सांगळे यांचे पती समाजसेवक दत्तू सांगळे यांनी ग्रामपंचायतस १० खुर्च्या भेट दिल्या.
यावेळी म्हारळ ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक अशोक परमार, सामाजिक कार्यकर्ते महेश देशमुख आदी उपस्थित होते. याप्रसंगी काही नागरिकांनी समाजसेवक दत्तू सांगळे यांना सांगितले की, आम्हांला लसीकरणासाठी खूप लांब जावे लागते, येथे सोय नाही, आमदार लक्ष देत नाहीत. असे समजताच सांगळे यांनी या भागाचे आमदार कुमार आयलाणी यांना फोन करून ठणकावले, आपण लोकप्रतिनिधी आहात, आपले जनतेच्या प्रति काही कर्तव्य नाही का? आपली यंत्रणा काय करते असे बोलून या भागातील नागरिकांसाठी कोरोना कोविड लसीकरण केंद्र वरप किंवा म्हारळ येथे सुरू करावे असे सांगितले. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील ही अडचण सांगण्यात आली आहे असे सांगळे यांनी सांगितले.
खरेच समाजसेवक दत्तू सांगळे यांचा नागरिकांसाठी केलेले प्रयत्न व जनतेच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींना विचारलेला जाब नक्कीच कौतुकास्पद आहे. असा प्रयत्न प्रत्येकांनी करायला हवा तेव्हाच सर्वसामान्यांना सोईसुविधा मिळेल.
No comments:
Post a Comment