दहावीच्या परीक्षा रद्द! शालेय शिक्षणमंत्री जाहीर केला निर्णय !!
मुंबई : दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचे प्रयत्न राज्य सरकार करत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय सोशल मिडियाद्वारे जाहीर केला. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. निकाल कसा तयार करायचा याबाबतचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील.
देशातील इतर सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बोर्डांनी त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. देशातील राष्ट्रीय पातळीवरील मंडळ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने तसेच आयसीएसई बोर्डाने देखील दहावीची शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सर्व बोर्डांच्या निर्णयांमध्ये समानता राहावी म्हणून राज्य मंडळाची देखील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
खूप छान निर्णय आता 12 वी च्या मुलाना पंन असेच पास करा म्हणजे खूप छान डॉक्टर, इंजिनिअर,आर्किटेक् तयार होतील 11वी ला आता आम्ही कोणत्या साइड ला प्रवेश घ्यावा हेही तुम्हीच सांगा धन्यवाद
ReplyDelete