म्हारळ वरप कांबा या बेवारस गावांना मनसे आमदार राजू पाटील यांचा आधार, वरप कोरोना कोविड सेंटर साठी मदत !!
कल्याण, (संजय कांबळे) : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या, तसेच सर्वात जास्त त्रास सोसावा लागलेल्या आणि सर्वाधिक जीव गमवावा लागलेल्या म्हारळ वरप कांबा या गावातील नागरिकांना ऐन संकटाच्या काळात 'बेवारस' सोडलेल्या उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी ने यावेळी दुसर्या लाटेत देखील मागील प्रमाणेच दुर्लक्ष केले. परंतु मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कोरोनाचे भंयकर संकट ओळखून ऐन गरजेच्या वेळी वरप कोरोना कोविड सेंटर साठी सुमारे दिड लाख रुपये किमतीचे साहित्य दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप कांबा या गावावर पहिल्यापासून अन्यायच झाला आहे. ही गावे उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असल्याने या गावाकडे कायमच दुर्लक्ष झाले आहे. येथील लोकप्रतिनिधींनी केवळ एक ओटबॅक म्हणूनच या गावाकडे पाहिले. याला गावातील काही मतलबी मंडळी जबाबदार आहेत हे नाकारुण चालणार नाही.
मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप कांबा या गावाची बिकट अवस्था झाली होती. ही गावे ना ग्रामीण ना शहरी भागात मोडत असल्याने येथील कोरोना पेशंट ना बेड, रुग्णवाहिका ना वेळेवर औषध उपचार मिळत नव्हता. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला होता. यावेळी येथील आमदार कुमार आयलाणी यांनी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही असा आरोप ग्रामस्थांचा आहे. माझी आमदार कै ज्योती कालाणी यांनी या गावाकडे थोडेफार लक्ष दिले होते. पण इतर लोकप्रतिनिधींनी गावातील अडी अडचणी, समस्या, प्रश्न याचा विचार केला नाही, किंवा या विषयावर बैठक घेतली नाही. अशातच वरप येथे कल्याण ग्रामीण भागातील रुग्णांनासाठी कोरोना कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी होऊ लागली. यातून राधा स्वामी संत्सग या धार्मिक संस्थेने स्वत चे प्रशस्त असा हाॅल दिला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री दर्जा प्रकाश पाटील, झेडपी अध्यक्षा सुषमा लोणे, कल्याण पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सर्व सदस्य,अधिकारी व कर्मचारी पत्रकार आदींनी मोठे प्रयत्न केले व अखेर राधा स्वामी संत्सग वरप कोरोना कोविड सेंटर सुरू झाले. पण तरीही आमदार महाशयांनी याकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे या परिसरात त्यांच्या विरोधात कमालीचा संताप पसरला आहे.
कसेबसे हे कोविड सेंटर सुरू झाले. परंतु येथे अनेक उणीवा राहिल्या. सरकारी काम अन सहा महिने थांब या म्हणी प्रमाणे निधी अभावी अनेक कामे रखडली, जसे आॅक्शिजन बेड, व्हॅन्टीलेटर, आदी पण याबाबतीत कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांना वरप कोरोना कोविड सेंटर साठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तात्काळ आमदार राजू पाटील यांनी वाॅटर कुलर, रो प्युवर, डसबीन, स्प्रे पंप, आदी आवश्यक साहित्य सुमारे दिड लाख रुपये किमतीचे साहित्य दिले. त्यामुळे काही प्रमाणात या कोविड सेंटर ची अडचण दूर होणार आहे.
तसे पाहिले तर आमदार राजू पाटील हे कल्याण ग्रामीण भागाचे आमदार आहेत, येथील स्थानिक आमदार कुमार आयलाणी हे आहेत. गेल्या दोन दिवसांपासून येथे पाणी नाही, इतर अडचणी आहेत. पण या आमदारांना याचे काही सोयरसुतक नाही त्यामुळे पुढील निवडणुकीत याची किंमत मोजावी लागेल तसेच त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असे अनेक ग्रामस्थांनी बोलून दाखवले. तर मनसेचे आमदार राजू पाटील यांचे सर्व स्थरांतून कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment