Saturday 17 April 2021

ठाणे जिल्हायातील ग्रामीण जनतेला दिलासादायक बातमी, भिवंडी तालुक्यातील सावाद येथे ऑक्सिजनयुक्त रुग्णालय कार्यान्वित !!

ठाणे जिल्हायातील ग्रामीण जनतेला दिलासादायक बातमी, भिवंडी तालुक्यातील सावाद येथे ऑक्सिजनयुक्त रुग्णालय कार्यान्वित !!


कल्याण, (संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्यातील एकमेव सर्व सोई युक्त अद्यायावत असे कोविड ग्रामीण रुग्णालय भिवंडी तालुक्यातील सावाद येथे आजपासून कार्यान्वित झाले असून ८०० बेडचे हे रुग्णालय ऑक्सिजनयुक्त असणार आहे. विशेष म्हणजे हे रुग्णालय केवळ ग्रामीण भागासाठी आरक्षित असल्याने आता तरी कल्याण, भिवंडी, शहापूर अंबरनाथ आणि मुरबाड मधील कोरोना पाॅझिटिव्ह पेशंटवर आॅक्शिजन अभावी जीव घमावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच आताच्या बिकट काळात ही दिलासादायक व आनंद देणारी बातमी म्हणावी लागेल.


राज्यात कोरोना ची दुसरी लाट उसळली आहे. सर्वच ठिकाणी कोरोना पेंशट भयानक वाढत आहेत. सर्व रुग्णालयातील बेड फुल्ल झाले आहेत. जागा मिळेल तेथे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एका बेडवर तीन ते चार पेंशट, जमीनीवर, खुर्चीत, रिक्षात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे व्हॅन्टेलिटर, ऑक्सिजन बेड केव्हाच संपले आहे. रेमडिसिवीर औषधाचा तूटवडा आहे यातही काही ठग काळाबाजार करीत आहेत. शहरी भागातील नागरिकांना कसेबसे बेड उपलब्ध होत आहेत. पण ग्रामीण भागातील रुग्णांची अवस्था खूपच बिकट झाली आहे आॅक्शिजन बेड न मिळाल्याने अनेकांचा जीव गेला आहे. अशा परिस्थितीत वरप येथील राधा स्वामी संत्सग कोरोना कोविड सेंटर सुरू झाले खरे परंतु येथे आॅक्शिजन न मिळाल्याने येथील पेंशट ना बाहेर पाठविण्याची नामुष्की ओढवली.


ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर तालुक्याचा विचार केला तर कल्याण तालुक्यात २१ हजार ७९४ इतके हायरिस्क पेशंट असून २ हजार १३६ अॅक्टिव, १९७० बाधित, घरी विलगीकरण १ लाख ५७ हजार ७२९, प्रतिबंधीत क्षेत्र २५ तर आतापर्यंत १४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहापूरात ४ हजार ३११ एकूण रुग आहेत. येथील १६२ गावात कोरोना बाधित पेंशट आहेत. तर १३६ पेंशट ना जीव गमवावा लागला आहे. भिवंडी तालुक्यात ८ हजार ९१५ रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत २५२ लोकांचा मृत्यू झाला आहे. काल एका दिवसात तब्बल १४० कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये पडघा २४, दिवाअंजूर ७, खारबाव ४२, कोन ३२, वज्रेश्वरी ५, दापाड ८, आनगाव २१, चिलीपाडा १ अशी कोरोनाची संख्या असून यातील मुरबाड व अंबरनाथ येथील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फोन न उचल्याने त्यांची आकडेवारी मिळू शकली नाही. असे असले तरी तेही काही हजारात असतील यात शंका नाही. त्यामुळे या सर्वाना हक्काचे व सर्व सोईसुविधा युक्त हाॅस्पिटल हवे अशी मागणी वारंवार होत होती. ती आता सावाद येथील कोरोना कोविड रुग्णालयाने पुर्ण झाली आहे. यांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ते सुरु झाले नव्हते.

पण आज पासून सावद येथील कोविड ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित होत आहे. काल रात्री जिल्हा रुग्णालयातून सावद येथे १५ रुग्णांना संदर्भित करण्यात आले असून त्यांना दाखल करून घेण्यात आलेले आहे. सावद येथे ऑक्सिजनची उपलब्धता असून ८०० खाटांचे रुग्णालय आहे. हे रुग्णालय ठाणे ग्रामीण साठी आरक्षित करण्यात आलेले असून ठाणे ग्रामीण भागातील सर्व रुग्णांना ही सुविधा आज पासून उपलब्ध होणार आहे.
ठाणे ग्रामीण भागातील ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज नाही अशा रुग्णांना त्या त्या कार्यक्षेत्रातील कोविड केअर सेंटर म्हणजेच सी सी सी मध्ये संदर्भित करण्यात येईल. आणि ज्या रुग्णांना ऑक्सिजन ची गरज आहे म्हणजेच ज्यांचा spo2 हा ९४ पेक्षा कमी आहे अशा रुग्णांना सावद येथील रुग्णालयात संदर्भित करण्यात येणार आहे. आज पासून ठाणे ग्रामीण भागातील रुग्णांना सावद येथील covid ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजनची गरज भासल्यास सावद येथील रुग्णालयात भर्ती करण्यात येईल.

प्रतिक्रिया :
राजेश नार्वेकर *(जिल्हाधिकारी, ठाणे) मध्यंतरी कोरोनाचे संकट कमी झाल्याने याकडे थोडेफार दुर्लक्ष झाले होते. परंतु आता पुर्ण क्षमतेने हे रुग्णालय कार्यान्वित झाले आहे. तरीही नागरीकांनी नियम पाळावेत, शासनास सहकार्य करावे.

*किशोर पंडित (नाका कामगार) शहापूर
भिवंडी तालुक्यातील सावाद येथील कोरोना रुग्णालय हे ग्रामीण भागातील रुग्णांना वरदान ठरणार आहे. पण शासनाने आमच्या सारख्या गोरगरीबांचा विचार करावा.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...