Friday 30 October 2020

स्वदेस फाऊंडेशन आणि आय.एल.अँण्ड एफ.एस यांच्या संयुक्त विद्यमाने गवंडी प्रशिक्षण वर्गाचे सीईओ डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न !

स्वदेस फाऊंडेशन आणि आय.एल.अँण्ड एफ.एस यांच्या संयुक्त विद्यमाने गवंडी प्रशिक्षण वर्गाचे सीईओ डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न !
 
         बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : स्वदेस फाऊंडेशन ही संस्था गेल्या २० वर्षापासून जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि सुधागड या तालुक्यांमध्ये आरोग्य, शिक्षण, आर्थिक विकास, पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प अशा विविध विषयांवर काम करीत आहे.
       याचाच एक भाग म्हणून दि.२८ऑक्टोबर २०२० रोजी कार्ले आदिवासीवाडी येथे गवंडी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामध्ये एकूण ४५ दिवसात २० युवकांना गवंडी कामाचे शास्त्रोक्त व तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर या प्रशिक्षणार्थींना कौशल्य विकास (भारत सरकार) यांचे प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात येणार आहे. 
       या वर्गाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शितल पुंड, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी मैनक घोष, श्रीवर्धन पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.भोगे, कार्यक्रम अधिकारी जयवंत गायकवाड, कार्ले ग्रामंपचातीचे सरपंच, ग्रामसेवक श्री.गोवारी, स्वदेस फाऊंडेशनचे तालुका प्रमुख राहुल कटारीया, तुषार इनामदार, प्रसादराव पाटील, दिपक गिऱ्हे, प्रवीण पवार व आय.एल.अॅण्ड एफ.एसचे नागेश लडगे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...