Saturday, 31 October 2020

खेड दापोली चे आमदार योगेश कदम यांची गोरेगांवला भेट ! गोरेगांवकरांनी केले स्वागत !!

खेड दापोली चे आमदार योगेश कदम यांची गोरेगांवला भेट ! गोरेगांवकरांनी केले स्वागत !! 


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड - दापोलीचे लोकप्रिय आमदार माननीय श्री. योगेश कदम यांनी गोरेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मुख्तार शेट वेलासकर यांच्या निवासस्थानी भेट देवून गोरेगाव विभागातील विकास कामांची माहिती घेतली. या प्रसंगी बोलताना महाविकास आघाडीतून गोरेगाव चा विकास करून घेण्याबाबत मार्गदर्शन केले. या विभागात आजपर्यंत फक्त खासदार सुनील तटकरे साहेबांनी विकास कामे केली आहे अशी मुख्तार शेट यांनी माहिती दिली. यापुढे महविकास आघाडीतून गोरेगावमधील विकासकामे केली जातील असे सांगून कोणत्याही विभागाचे काम सांगितले तरी करून देण्याचे आमदारांनी आश्वासन दिले. तसेच नगरविकास मंत्री अब्दुल सत्तर आज मंडणगड येथे येत असून त्यांच्या खात्याची कामे करून  देता येतील असे सांगितले.
      गोरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जुबेर अब्बसी, उपसरपंच विनोद बागडे, माजी उपसरपंच चंद्रकांत गोरेगावकर, सदस्य सलीम राखांगी, ग्रामपंचायत सदस्या वैष्णवी पितळे,  मोहिनी गोरेगावकर, इस्वलकर, वर्षा लाड यांनी आमदारांचे स्वागत केले, मुस्लिम समाजाच्या वतीने इम्रान मणियार, करदेकर, शब्बीर बावा  लोखंडे यांनी स्वागत केले. वेलासकर यांच्या कुटुंबाने भेटवस्तु  देवून वैयक्तिक स्वागत केले. 
     गोरेगाव सरपंच जुबेर अब्बासी यांनी विविध विकास कामांची माहिती दिली. मुनावर टोल यांनी माणगाव किंवा महाड येथे पासपोर्ट ऑफिस देण्याची मागणी केली. तसेच आर. टी.ओ. कार्यालय माणगाव येथे देण्याची मागणी केली. या वेळी शिवसेनेचे नेते विजयराज खुळे, विकास गायकवाड, अमजद अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...