Sunday, 1 November 2020

दिवाळी पुर्वी भातखरेदी केंद्र सुरु करून भाताला हमी भाव द्या. अन्यथा उपोषण करणार !! **स्वराज्य भातपिक संघटनेची मागणी **

दिवाळी पुर्वी भातखरेदी केंद्र सुरु करून भाताला हमी भाव द्या. अन्यथा उपोषण करणार !!    
 **स्वराज्य भातपिक संघटनेची मागणी **


मुरबाड (मंगल डोंगरे) : दिवाळी पूर्वी भात खरेदी केंद्र सुरु करावीत आणि भाताला 4000/- रुपये प्रति क्विंटल भाव दयावा. यासह अन्य मागण्यांसाठी स्वराज्य भातपिक उत्पादक शेतकरी संघटनेने मा.तहसीलदार मुरबाड ल खरेदी-विक्री संघाकडे एका निवेदना द्वारे केली असुन, याबाबत तात्काळ निर्णय न झाल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
             भातखरेदी केंद्रे दिवाळी पुर्वी सुरु करावीत. भातास प्रतिक्विंटल 4000/- रुपये भाव द्यावा. भातखरेदी केंद्रावर सी.सी.टी.व्ही. कँमेरे लावावेत.भात खरेदी केलेल्या दिवशीच शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करावेत. भातखरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंद वही ठेवण्यात यावी. त्यावर शेतकऱ्याची स्वाक्षरी घ्यावी. वजन केलेल्या भातापेक्षा बारदानाच्या वजना इतकेच जादा भात घेण्यात यावे.भात वजन केलेले शेतकऱ्याचे बारदान परत मिळावे. शेतकऱ्यांचा माल घरुन उचल करुन केंद्रापर्यंत आणण्यासाठी संस्थेने वाहनांची व्यवस्था करावी. अशा मागण्या स्वराज्य भातपिक संघटनेने केली आहे.

No comments:

Post a Comment

पाकिस्तान विरुद्ध लढताना घाटकोपर मधील जवान मुरली नाईक शहीद !!

पाकिस्तान विरुद्ध लढताना घाटकोपर मधील जवान मुरली नाईक शहीद !! घाटकोपर, (केतन भोज) : भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी ...